लोणी काळभोर: पुणे सोलापूर राष्ट्रीय (Loni Kalbhor Sex Racket Open) महामार्गावरील (Loni Kalbhor News) प्रसिद्ध व नामांकित असलेल्या हॉटेल जयश्री एक्झीक्यूटिव्ह रेस्टॉरंट, बार अँड लॉजिंगवर (Hotel Jayashree) डमी ग्राहक पाठवून खुलेआम सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा (Pune Crime) पर्दाफाश करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शुक्रवारी (ता.19) दुपारच्या सुमारास छापा टाकून दोघांना अटक केली आहे तर दोन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Pune Breaking News)

हॉटेल व्यवस्थापक मोहन कसनु राठोड (वय-50. सध्या रा. श्री साई बिल्डींग, फ्लॅट नं. 205, पाषाणकर बाग जवळ, लोणी काळभोर, ता. हवेली, जिल्हा-पुणे) व वेटर गणेश दत्ता चिलकेवार (वय-25 वर्ष, रा. जयश्री लॉज स्टाफ रुम, कवडीपाट टोलनाका, लोणीकाळभोर, ता. हवेली जिल्हा-पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल जयश्रीवर देहविक्री सुरू आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत खात्रीशीर मिळाली होती. या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यासाठी एक डमी ग्राहक तयार केले. आणि त्याला हॉटेल जयश्रीवर शनिवारी (ता.19) पाठवून दिले. डमी ग्राहकाने हॉटेल मधील मॅनेजर मोहन राठोड याच्याकडे महिलेच्या सर्व्हिसची मागणी केली.
हॉटेल मॅनेजर मोहन राठोड यांनी डमी ग्राहकाला होकार दिला. आणि रुम भाडे 1 हजार 500 रुपये असल्याचे सांगुन रुम नं. 202 मध्ये पाठविले. तर वेटर गणेश चिलकेवार याने 100 रुपये घेऊन कंडोम पाकिट पुरवले. त्यानंतर आरोपी मोहन राठोड यांनी पिडीत महिलांना बोलाऊन घेतले. पिडीत महीला यांना डमी ग्राहकाकडे शाररिक संबंध ठेवण्यासाठी 5 हजार रुपये चार्ज करीत असल्याचे सांगितले. डमी ग्राहकाला देहविक्री होत असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी तत्काळ कॉलव्दारे पोलिसांच्या पथकाला माहिती दिली.
डमी ग्राहकाचा इशारा आल्यानंतर घटनास्थळावळ सापळा रचून बसलेल्या लोणी काळभोर पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर तत्काळ छापा मारला. तेव्हा आरोपी मोहन राठोड व गणेश चिलकेवार हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता महीलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल, कंडोम पाकिट असा सुमारे 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी मोहन राठोड व गणेश चिलकेवार यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 व भारतीय न्याय संहिता कलम 143, 3(5). प्रमाणे गुन्हा दाखल अटक केली आहे. तर दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार अण्णा माने, सागर जगदाळे, महिला पोलीस अंमलदार वनिता यादव, सचिन सोनवणे, कुंभार व मल्हारी ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.






