Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: कदमवाकवस्ती येथील ‘मैफिल पान शॉप’वर पोलिसांचा छापा..! दोघांना अटक तर सुमारे 2 लाखांचे अंमली पदार्थ जप्त ; तरुण पिढी नशेली पानाच्या विळख्यात अडकल्याचा नागरिकांचा आरोप

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 March 2026, 10:46

लोणी काळभोर: कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात खुलेआम विकल्या जाणाऱ्या नशेली पानाच्या व्यवसायावर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अंमली विरोधी पथक क्र. दोनने शुक्रवारी (ता. 13) सायंकाळी पाचच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील ‘मैफिल पान शॉप’वर अचानक छापा टाकत दोन जणांना अटक केली. या कारवाईत 266.4 ग्रॅम अंमली पदार्थ मिश्रित पान, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात दुकान मालक निशांत दत्तात्रय काळभोर (वय 19, रा. बाजारमळा, लोणी काळभोर) आणि कामगार रामजी संतोष पटेल (वय 33, कामगार, सध्या रा. कदमवाकवस्ती, मूळ रा. जि. बांदा, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील रोहित जवळकर (रा. लोणी काळभोर) हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ व सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा कलम 8(c), 17(b), 22(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमली विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि मोबाईल ड्रग टेस्टिंग मशीनच्या सहाय्याने तपास केला असता खाण्याच्या पानामध्ये अ‍ॅम्फेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स आणि मेथाम्फेटामाइन या धोकादायक अंमली पदार्थांचे मिश्रण करून नशेली पाने विकली जात असल्याचे उघड झाले. या उघडकीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर परिसरातील अनेक पान टपऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र नागरिकांच्या मते, ही कारवाई खूप उशिरा झाली आहे.

पूर्व हवेली परिसरात सुमारे 200 हून अधिक ठिकाणी नशा देणारी पाने विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही दुकाने पुणे–सोलापूर महामार्गालगत, चौकाचौकात तसेच हॉस्टेल, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात बिनधास्त सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या पानाच्या आहारी जात असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

या नशेली पानाची किंमत साधारण 35 रुपये असून ते खाल्ल्यानंतर दारूच्या बाटलीइतकी नशा होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या पानाला दारू किंवा गुटख्यासारखा वास नसल्यामुळे पालकांना मुलांनी नशा केल्याचे लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये नकळत तरुण पिढी व्यसनाच्या दलदलीत अडकत असल्याचे चित्र समोर येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यसभा आणि विधानसभेतही नशेली पानाचा मुद्दा गाजला होता, तरीही स्थानिक प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने ठोस मोहीम राबवली नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. परिणामी आज हा व्यवसाय अनेक ठिकाणी वाढला असून तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत ढकलणारा हा धोकादायक प्रकार प्रशासनाच्या नजरेआड कसा राहिला? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या पानामुळे विद्यार्थ्यांमध्ये भांडणे, आरोग्याच्या समस्या आणि असामाजिक वर्तन वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे केवळ एका दुकानावर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर पूर्व हवेलीतील सर्व नशेली पान विक्री केंद्रांवर व्यापक मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

“कदमवाकवस्तीतील ‘मैफिल पान हाऊस’वर छापा टाकून दुकानातील अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून येथून पुढेही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.”

पंडित रेजीतवाड (पोलीस निरीक्षक- अंमली विरोधी पथक क्र. 2)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

गर्भवतीला गोळ्या दिल्या, उलटं झोपवलं अन् पोटाला जोरात दाबलं; गर्भलिंग तपासणी करून मुलगी असल्याचं कळताच घरातच अघोरी कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.