Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार सद्दाम अन्सारीची एक वर्षासाठी अमरावती कारागृहात रवानगी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 December 2025, 8:32
Loni Kalbhor News: Saddam Ansari, a hardened criminal from Loni Kalbhor, sent to Amravati Jail for one year

लोणी काळभोर: कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथील एका अट्टल (Loni Kalbhor News) गुन्हेगाराला महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, 1981 प्रमाणे एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ (Pune Crime) पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

 

सद्दाम इरफान अन्सारी (वय-21 इंदिरानगर, कदमवाकस्ती, लोणी काळभोर, ता, हवेली, जि, पुणे) असे स्थानबध्द करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे. तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. याकरीता पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, लोखंडी कोयते वापरुन गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार, बेकायदेशीर मटका जुगार धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले. पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी तसेच शरीर व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवणे. त्यांच्या विरुध्द ठोस व परिणामकारक कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत पोलिसांना आदेश दिले आहेत.

सद्दाम अन्सारी हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक सराईत गुन्हेगार आहे. पोलिस प्रशासनाकडून त्याच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. परंतु, तो प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने घातक धारदार हत्यारांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, बेकायदेशिरपणे घातक शस्त्र जवळ बाळगणे, घातक हत्याराच्या जोरावर दहशत पसरविणे अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य राजरोसपणे करीत होता. त्याला पुणे शहरातुन हद्दपारदेखील करण्यात आले होते. परंतु, तो गुन्हेगारी कृत्य करुन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक असलेली कृत्ये करत होता.

सद्दाम अन्सारी याच्यावर कायद्याचा वचक बसावा. म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन पोलिस उपायुक्त डॉ. डॉ. राजकुमार शिंदे यांच्यामार्फत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता. अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन सद्दाम अन्सारी अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी सद्दाम अन्सारी याची अमरावती कारागृहात रवानगी केली आहे.

ही कामगिरी पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील,पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस व निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) स्मिता पाटील, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार सुनिल नागलोत, तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, दिपक सोनवणे व महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांच्या पथकाने केली आहे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24
Next Post
Weather Report: Pune is freezing! The mercury has dropped below 10 degrees; Visibility is zero in Pune due to dense fog, drivers beware...

Weather Report: पुणे गारठलं! पारा 10 अंशांच्या खाली घसरला; दाट धुक्यामुळे पुण्यात 'विझिबिलिटी' झिरो, वाहनचालकांनो सावधान...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.