लोणी काळभोर, ता. 16: घरी कोणीही नसल्याची संधी साधून बारावीच्या विद्यार्थिनीच्या घरात घुसून बळजबरीने सेक्स करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नराधमाच्या अत्याचाराला विरोध केल्याने विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लोणी काळभोर परिसरात बुधवारी (ता.14) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Loni Kalbhor News)

समीर अकबर हाश्मी (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जिल्हा-पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 19 वर्षीय पिडीतेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परंतु, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता या लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत आहे. सन 2021 पासून समीर हाश्मी याने पिडीतेला वेळोवेळी “तु मला हो म्हण नाही तर तुला मी जगू देणार नाही, तुला शिक्षण घेऊ देणार नाही, तुला मानसिक त्रास देऊन, तुझा छळ करणार आहे. मी पोलीस स्टेशनला घाबरत नाही, मी दुसऱ्या दिवशी सुटुन बाहेर येईन? असे म्हणाला. काहीही केल्यानंतर पिडीता हो म्हणत नसल्याने आरोपीने तिला धमकी देण्यास सुरवात केली.
आरोपी समीर हाश्मी याने पिडीतेकडून हो म्हणून वदवून घेण्यासाठी तिच्या आई वडीलांना जीवे मारण्याची व बहीणीला शाळा सुटल्यानंतर उचलून नेण्याची वारंवार धमकी दिली आहे. तसेच पिडीता या बुधवारी (ता.14) दुपारी घरी एकट्या होत्या. तेव्हा घरामध्ये कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी समीर हाश्मी हा जबरदस्तीने घरात घुसला.
दरम्यान, घरात जबरदस्तीने घुसल्यानंतर आरोपी समीर हाश्मी याने पिडीतेचा गळा दाबला आणि सेक्स करायचा असे बोलून टी-शर्ट बाजुला करुन सेक्स करण्याचा प्रयत्न करु लागला. आरोपीच्या अत्याचाराला विरोध करुन पिडीतेने ओरडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी समीर हाश्मी याने पिडीतेच्या ओठावर जोरात बुक्की मारुन जखमी केले.
पिडीत विद्यार्थिनीच्या मनाविरुध्द आरोपीने सेक्स करण्याचा प्रयत्न केला. तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न करणारे वर्तन केले आहे. म्हणून पिडीतेने याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी समीर हाश्मी याच्यावर भारतीय न्याय संहीता कलम 74 , 75 , 78 , 351, 331, 115 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ नाळे करत आहेत.







