लोणी काळभोर, ता. 25: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अवजड गाडी बंद पाडून वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी एका चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमनसिंग (वय 38, रा. सैदुवाल खुर्द, जि.ता. गुरुदासपुर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. (Loni Kalbhor Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर वाहतुक विभागात अनिल विश्वनाथ गायकवाड हे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. तर अमनसिंग हा पिक अव्हर्स मध्ये क्रेन घेऊन हडपसर गाडीतळ येथून सोलापूरच्या दिशेने बुधवारी (ता.24) दुपारच्या सुमारास चालला होता. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची गाडी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एच पी गेट जवळ बंद पडली.
दरम्यान, अमनसिंग याने पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उप आयुक्त यांनी रितसर जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. अवजड वाहन घेवून गर्दीच्या ठिकाणी येऊन वाहतुक कोंडी केली आहे. अशी तक्रार अनिल गायकवाड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार चालक अमनसिंग याह्च्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223, 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राणी खामकर करत आहेत.







