अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीनंतर (Ladaki Bahin Yojana) राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी (Ahilyanagar News) करण्यात आली. या पडताळणीत अहिल्यानगर जिल्ह्यातील 523 लाभार्थी अपात्र ठरले आहेत. या अपात्र लाभार्थ्यांनी आतापर्यंत घेतलेल्या एक लाख (Pune News) रुपयांहून अधिक रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे अपात्र लाभार्थ्यांची सविस्तर यादी प्राप्त झाली आहे. (Latest Marathi News)

वसुलीची प्रक्रिया सुरू
शासनाकडून पाठवण्यात आलेल्या या यादीत संबंधित लाभार्थ्यांची नावे, गावांची माहिती तसेच इतर तपशीलांचा समावेश आहे. या यादीनुसार आता प्रत्यक्ष वसुलीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वसुलीबाबतची नोटीस दिली जाणार आहे. नोटीसमध्ये लाभाची रक्कम शासनाकडे परत जमा करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. (Breaking News)
घेतलेली रक्कम बँकेत जमा करावी लागणार
महिला व बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार, संबंधित लाभार्थ्यांनी त्यांनी घेतलेली रक्कम बँकेत जमा करणे बंधनकारक राहणार आहे. रक्कम जमा केल्यानंतर त्या बँक चलनाची प्रत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे सादर करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित प्रकरण बंद करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना अहिल्यानगरचे महिला व बालकल्याण अधिकारी संजय कदम यांनी सांगितले की, शासनाकडून आलेल्या यादीनुसार अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. कोणत्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी ही पडताळणी करण्यात आली असून, अपात्र लाभ घेतलेल्या महिलांकडूनच रक्कम परत घेतली जाणार आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पुढील काळात अशा योजनांमध्ये अधिक काटेकोर तपासणी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







