Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Revenue Department: महसूलच्या ‘कामबंद’ आंदोलनाचा दणका! महसूल विभागाच्या सर्व मागण्या मान्य; राज्यव्यापी संप अखेर मागे…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 20:41
Revenue Department: The 'work stoppage' of the Revenue Department has hit hard! All the demands of the Revenue Department have been accepted; The state-wide strike has finally been called off...

पुणे: महाराष्ट्र राज्य महसूल (Revenue Department) अधिकारी व कर्मचारी समन्वय (Maval News) महासंघाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेले राज्यव्यापी (Pune News) कामबंद आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. दिनांक 16/12/2025 रोजी आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर, दिनांक 18/12/2025 रोजी महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महसूल मंत्री, (Chandrashekhar Bawankule) महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव आणि महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने मावळ, पुणे येथील प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन तीन दिवसांच्या आत मागे घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. यासाठी विभागीय आयुक्तांकडून तात्काळ अहवाल मागवण्यात येणार असून, जिल्हाधिकारी स्तरावर झालेली गौण खनिज विषयक सर्व कारवाई मागे घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. (Breaking News)

 

पालघरमधील कर्मचाऱ्यांचे निलंबनही तात्काळ मागे घेण्यात येणार आहे. तसेच, गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी नवीन डिजिटल प्रणाली विकसित केली जाईल, ज्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्याची गरज भासणार नाही आणि थेट नोटीस तयार होईल. नायब तहसीलदार, महसूल सहायक आणि मंडळ अधिकारी यांच्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करण्याबाबतचा प्रस्ताव वेतन त्रुटी समितीकडे पाठवून त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महसूल विभागातील पदोन्नती प्रक्रियेला गती देऊन रिक्त पदे भरण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

महसूल मंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनांनंतर समन्वय महासंघाने आपले कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत महासंघाचे समन्वयक जीवन आहेर, अध्यक्ष विजय टेकाळे, सुरेश बगळे, बाळकृष्ण गाढवे, निळकंठ उगले, दीपक चव्हाण, नामदेव शिंदे, अनिल सूर्यवंशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल महासंघाच्या वतीने महसूल मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत. महसूल विभागाचे कामकाज आता सुरळीतपणे सुरू होईल. वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या या बैठकीनंतर पुकारलेला संप अखेर मिटला असून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना यश आले आहे

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21
Next Post
Pune News

Pune News : रस्ते नाहीत, समोर फक्त दाट धुकं अन् पाऊस; ३ तरुणांनी असं काय केलं की अख्खा महाराष्ट्र थक्क झाला?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.