पुणे: पुण्यातील सहकार क्षेत्राला काळिमा(Hadapasar Money Scam) फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णकांत कुदळे नागरी सहकारी पतसंस्थेत 1 कोटी (Krushnakant Kudale Nagari Sahkari Patsanstha) रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे उघडकीस (Hadapsar News) आले असून, या प्रकारामुळे (Pune Crime) ठेवीदारांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पतसंस्थेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पदाचा गैरवापर
शासकीय लेखापरीक्षणात या पतसंस्थेतील गैरव्यवहार समोर आला आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत, म्हणजे तब्बल 4 वर्षांत हा आर्थिक अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्कालीन शाखा व्यवस्थापक स्वराज बाळासाहेब शिंदे याने आपल्या पदाचा गैरवापर करत ठेवीदारांच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नियमांची पायमल्ली
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कर्जवाटप करताना कोणतेही नियम पाळण्यात आले नाहीत. कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि नियमांची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली. तसेच, कर्जाची वसुली करण्यात आलेली रक्कम संस्थेच्या खात्यात जमा न करता तिचा वैयक्तिक वापर केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
रोख वह्यांची फेरफार
दैनंदिन रोख वह्यांची योग्य तपासणी न करता त्यामध्ये फेरफार करण्यात आला. कॅश बुकमधील नोंदी चुकीच्या पद्धतीने बदलण्यात आल्याने प्रत्यक्ष व्यवहार आणि नोंदी यामध्ये तफावत आढळून आली आहे. याशिवाय, कर्ज देताना जामीनदारांची कोणतीही शहानिशा करण्यात आली नसल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे अनेक जामीनदारांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपहाराची रक्कम 1 कोटी
या प्रकरणी सहकार विभागाचे शासकीय लेखापरीक्षक राजेंद्र सीताराम कांबळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पहिल्या लेखापरीक्षणात काही त्रुटी आढळल्यानंतर फेरलेखापरीक्षण करण्यात आले आणि त्यानंतर एकूण अपहाराची रक्कम 1 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले.
सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या अपहारात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.







