प्रतिनिधी- इम्रान अत्तार

Election Result 2025 : भोर नगरपालिका सार्वत्रिक २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २० पैकी १६ जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रामचंद्र(नाना) श्रीपती आवारे १७० मतांनी विजयी होत भारतीय जनता पक्षाच्या संजय जगताप यांना पराभूत केले . त्यामुळे भाजपात प्रवेश करून गेलेले संग्राम थोपटे यांचे भोर नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व न राहता गड आला पण सिंह गेला अशी अवस्था होत भोर नगरपालिकेत भाजपाचे जादा नगरसेवक येऊनही नगरपरिषद नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा आल्याने राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली.
या निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर, माजी नगरसेविकेचे पती बजरंग शिंदे यांचा पराभव झाला आहे. तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये आशु सोमनाथ ढवळे व ॲड.जयश्री राजकुमार शिंदे यांना समान मते मिळाल्याने यांच्या दोघांमध्ये चिठ्ठी टाकून भाजपाच्या जयश्री शिंदे यांचा चिठ्ठीवर विजय घोषित करण्यात आला. या निवडणुकीत स्नेहल तुषार घोडेकर यांचा सर्वाधिक ४२६ मतांनी विजयी झाला आहे तर सर्वात कमी २१ मताने राष्ट्रवादीच्या सुरेखा मळेकर विजयी झाल्या आहेत (Election Result 2025)
या निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर, माजी नगरसेविकेचे पती बजरंग शिंदे यांचा पराभव झाला आहे. तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये आशु सोमनाथ ढवळे व ॲड.जयश्री राजकुमार शिंदे यांना समान मते मिळाल्याने यांच्या दोघांमध्ये चिठ्ठी टाकून भाजपाच्या जयश्री शिंदे यांचा चिठ्ठीवर विजय घोषित करण्यात आला. या निवडणुकीत स्नेहल तुषार घोडेकर यांचा सर्वाधिक ४२६ मतांनी विजयी झाला आहे तर सर्वात कमी २१ मताने राष्ट्रवादीच्या सुरेखा मळेकर विजयी झाल्या आहेत.
रविवार (दि.२१)सकाळी दहा वाजता कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय भोर येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक एक ते पाच एकाच वेळी मतमोजणी सुरू करण्यात आली पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी आघाडी घेतली. तर तीन ते दहा प्रभागात भाजपने आघाडी घेतली फक्त प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराने आघाडी घेतली. तर नगराध्यक्ष पदाच्या पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये २४५ मताची भाजपाचे उमेदवार संजय जगताप यांनी आघाडी घेतली होती. परंतु पुढील प्रभाग क्रमांक ६ ते १० मध्ये रामचंद्र आवारे मुसंडी यांनी आघाडी घेत रामचंद्र आवारे १७० मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाचे दोन्ही उमेदवारांना आपापल्या प्रभागामध्ये मोठी आघाडी घेता आली नाही.
या निवडणुकीमध्ये माजी उपनगराध्यक्ष जगदीश किरवे सलग सातव्यांदा नगरसेवक झाले आहेत. अमित सागळे यांनीही सागळे घराण्याची बाजी मारत नगरसेवक म्हणून मोठ्या फरकाने ४१५ मताधिक्याने निवडून आले, सुमंत शेटे,स्नेहा पवार, माजी नगरसेवक समीर सागळे यांच्या पत्नी पल्लवी सागळे, माजी नगरसेवक देविदास गायकवाड यांच्या पत्नी मयुरी गायकवाड याही ४१४ मताधिक्याने निवडून आल्या. संपूर्ण पाच फेरीनंतर अटीतटीच्या लढतीत १७० मतांनी रामचंद्र आवारे नगराध्यक्षपदी निवडून येत भाजपाच्या संजय जगताप यांचा पराभव केला.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात नकळत झालेली ही लढत उपमुख्यमंत्री यांनी बाजी मारत भोरची नगरपरिषद एक नगराध्यक्ष व चार नगरसेवक निवडून आणत काबीज केली.
भोर नगरपरिषदेत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे
नगराध्यक्ष
रामचंद्र श्रीपती आवारे – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक १
१) सुरेखा मळेकर- राष्ट्रवादी काँग्रेस
२) अनिल भेलके -राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक २
१)कुणाल धुमाळ- राष्ट्रवादी काँग्रेस
२) जयश्री शिंदे – भा ज पा ( चिठ्ठी टाकून विजयी)
प्रभाग क्रमांक ३
१) रेणुका बदक – भा ज पा
२) जगदिश किरवे – भा ज पा
प्रभाग क्रमांक ४
१) अमित सागळे -भा ज पा
२) तृप्ती सुपेकर- भा ज पा
प्रभाग क्रमांक ५
१) जयवंत शेटे- भा ज पा
२)मयुरी गायकवाड -भा ज पा
प्रभाग क्रमांक ६
१) मनिषा पवार – भा ज पा
२)कुणाल पलंगे-भा ज पा
प्रभाग क्रमांक ७
१) गणेश मोहीते- भा ज पा
२)स्नेहल घोडेकर – भा ज पा
प्रभाग क्रमांक ८
१) पल्लवी सागळे – भा ज पा
२) सचिन तारू- भा ज पा
प्रभाग क्रमांक ९
१) केदार देशपांडे – राष्ट्रवादी काँग्रेस
२) मनिषा भेलके- भा ज पा
प्रभाग क्रमांक १०
१) सुमंत शेटे – भा ज पा
२)स्नेहा पवार – भा ज पा






