Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रामनवमी मिरवणुकीतील कर्णकर्कश आवाजाचा फटका; ससाणेनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 29 March 2026, 16:39

पुणे, ता. 29 : हडपसरमधील ससाणेनगर येथे रामनवमी निमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या तीव्र ध्वनीप्रदूषणाचा फटका एका ज्येष्ठ महिलेला बसून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात ध्वनीप्रदूषण आणि पोलिसांच्या निष्काळजीपणाबाबत तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

 

मृत महिलेचे नाव रंजना रवींद्र जाधव (वय 65, रा. लेन नं. 12, ससाणेनगर, हडपसर) असे असून त्या सायंकाळी सुमारे आठच्या सुमारास मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. त्या वेळी परिसरात अनेक मिरवणुका सुरू असून मोठ्या आवाजात डीजे आणि गाण्यांचा दणदणाट सुरू होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, जय श्रीरामाच्या घोषणांसह चित्रपटातील हिंदी गाणी मोठ्या आवाजात वाजवली जात होती. या कर्णकर्कश आवाजामुळे जाधव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना रिक्षामधून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला; मात्र चौकात मिरवणुकीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे रिक्षाला मार्ग मिळण्यास उशीर झाला. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

दरम्यान, शासनाच्या नियमानुसार ध्वनीची मर्यादा 90 डेसिबलपेक्षा जास्त नसावी, असे स्पष्ट निर्देश असतानाही मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात आवाजाचा वापर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे, परिसरात पोलीस बंदोबस्त असूनही ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवले गेले नाही, अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

31 मार्चची डेडलाईन चुकली तर खिशाला लागणार मोठी कात्री; 1 एप्रिलपासून पूर्ण बदलणार नियम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.