गणेश सुळ

दौंड: दाट धुक्यामुळे दुधाचा टँकर व छोटा हत्ती या दोन वाहनामध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. गुरुवारी (ता. 20) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील पारगाव परिसरात हि घटना घडली आहे.
कमल आबासो टुले (वय- 46, एकेरीवाडी, ता. दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या दुर्घटनेत पती आबासाहेब टुले (वय-52) व मुलगा देविदास टुले (वय -28) हे गंभीर जखमी झालेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून टुले कुटुंब शिरूर येथून भाजीपाला खरेदी करणे व दौंड तालुक्यातील आठवडे बाजारात त्याची विक्री करणे असा व्यवसाय करत होते. गुरुवारी रात्री दो नवाजता शिरूर येथून भाजीपाला खरेदी करून हे कुटुंब 6 वाजण्याच्या सुमारास अगदी तालुक्याच्या शिवेवर आले होते.
पारगाव गावालगत असलेल्या भीमा नदीचा पुल ओलांडूत असताना दाट धुक्याने कॅरी गाडी व दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये कमल टुले या जागीच ठार झाल्या तर पती आबासो टुले व मुलगा देविदास टुले यांना गंभीर मार लागला. ग्रामस्थांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर पती व त्यांच्या मुलावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, गुरुवारी रात्री सहा वाजण्याच्या सुमारास कमल टुले यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व नातेवाईकांचा आक्रोश पिळवटून टाकणारा होता.







