लोणी काळभोर, (पुणे): लोणी काळभोर (ता. हवेली) येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय एकनाथ काळभोर (वय -73) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता. 14) निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांचे ते वडील तर साधना बँकेचे संचालक सुभाष आप्पा काळभोर यांचे ते चुलतभाऊ होत.
दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.







