Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन जवळील खामगाव टेक येथे डीपी फोडून तांब्याच्या तारांची चोरी; 30 हजारांचे नुकसान

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 30 October 2026, 10:39

उरुळी कांचन, (पुणे) : खामगाव टेक (ता. हवेली) गावच्या हद्दीत वनविभागाच्या जमिनीवरील विद्युत रोहित्राचे (डीपी) नट-बोल्ट उचकटून त्यातील 30 हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरीला नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले सुनील संभाजी नव्हारे (वय 35, रा. डाळिंब रोड, उरुळी कांचन) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 23 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खामगाव टेक गावच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवरील गट क्रमांक ७० मधील विद्युत रोहित्र चोरट्यांनी डीपीचे नट-बोल्ट उचकटून ते जमिनीवर पाडले. त्यानंतर डीपीमधील तेल सांडून नुकसान करत त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शुक्रवारी (ता. 23) ग्रामस्थ दत्तात्रय सोपान थोरात यांनी फोनद्वारे या घटनेची माहिती नव्हारे यांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरात चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारांचा शोध घेतला; मात्र त्या मिळून आल्या नाहीत. महावितरणच्या कोरेगाव मूळ शाखा क्रमांक 2 येथील सहाय्यक अभियंता अमोल जाधव यांनी नुकसानीचा व चोरीचा पंचनामा केला. त्यानंतर शनिवारी (ता. 24) नव्हारे यांनी उरुळी कांचन पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास विकास लगस करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन जवळील खामगाव टेक येथे डीपी फोडून तांब्याच्या तारांची चोरी; 30 हजारांचे नुकसान

Friday, 30 October 2026, 10:39

मांजरीत भरदिवसा घरफोडी; रोकडसह सुमारे 2 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

Friday, 30 October 2026, 10:35

इंदापूर तालुक्यात खळबळ! अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

Friday, 30 October 2026, 10:25

धनत्रयोदशीच्या तोंडावर सोने-चांदीची चमक फिकी; दरघसरणीने गुंतवणूकदार संभ्रमात! एमसीएक्सवर घसरणीचे सत्र कायम; खरेदी करावी की आणखी दरकपातीची प्रतीक्षा, ग्राहकांसमोर प्रश्न

Friday, 30 October 2026, 10:14

ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकरांच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण! भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत सूचक वक्तव्य; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीच्या शक्यतेची चर्चा

Friday, 30 October 2026, 10:10

मतदार यादीत तुमचं नाव नाही? अजिबात काळजी करू नका! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात १३ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीची संधी

Friday, 30 October 2026, 10:05
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp