Baramati Nagar Parishad Election: पुणे जिल्ह्यातील बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडूनही नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी घोषणा केली आहे. तर आता भाजपकडून बारामती नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी गोविंद देवकाते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सचिन सातव हे बारामती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. सातव यांनी बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक देखील राहिले आहेत.
BJP कडून उमेदवार जाहीर
बारामती नगराध्यक्ष पदासाठी BJP कडून गोविंद देवकाते यांना उमेदवारी दिली आहे. बारामतीत भाजप 30 जागा लढवणार आहे. येथे भाजपने जात घटक लक्षात घेऊन गोविंद देवकाते यांना उमेदवारी दिली आहे. बारामतीत भाजपने ओबीसी चेहरा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवला आहे.
दरम्यान, बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र महाविकास आघाडीकडून अजून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत अजून सस्पेन्स कायम आहे.







