Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक प्रकार! शिपायाने शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीशी ओळख वाढवली; अश्लील मेसेज पाठवले अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 October 2025, 14:22
Pune Crime: Shocking incident in Pune! Soldier got acquainted with girl who came to get admission in school; sent obscene messages and...

पुणे: कर्वेनगरमधील एका (Pune Crime) नामांकित मुलींच्या शाळेत (Pune News) दाखला घ्यायला आलेल्या तरुणीचा नंबर घेऊन तिला वारंवार अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बावधने (वय 43, रा. कोथरूड) असे या शिपायाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय तरुणी दाखल्यासाठी शाळेत आली होती. त्यावेळी मुख्याध्यापिका उपलब्ध नसल्याने तिच्या दाखल्यावर सही राहिली होती. त्यावेळी बावधने याने तरुणीचा मोबाईल नंबर घेतला आणि दाखला पूर्ण झाल्यावर कळवितो असे सांगितले. त्यानंतर त्याने वारंवार त्या तरुणीला मेसेज पाठवून त्रास दिला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात उशीर होत असल्याचे कारण देत पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील मराठे यांच्या नेतृत्वाखाली कर्वेनगर पोलिस चौकी आणि शाळेच्या गेटसमोर आंदोलन केले.

विशेष म्हणजे आंदोलनादरम्यान मुख्याध्यापकांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास नकार दिला. सुरक्षारक्षकांनी शाळेचे गेट बंद केले, तर शिपायाला मागच्या गेटमधून बाहेर काढण्यात आल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पोलिस शाळेत पोहोचले तेव्हा शिपाई शाळेत नव्हता, अशी माहिती सुनील मराठे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बावधने याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामदास भरसठ करत आहेत.

या संदर्भात मुख्याध्यापिका आशा कांबळे यांना विचारले असता त्यांनी, “हे प्रकरण नक्की काय आहे याची मला माहिती नाही. शिपायाने काय केले याबद्दलही मला ठाऊक नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, संस्थेच्या सचिवांनी संबंधित शिपायाला निलंबित केल्याचे सांगितले असून, “त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. शाळेत अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी सर्व कर्मचारी आणि शिक्षकांना कठोर सूचना देण्यात येतील,” असे त्यांनी नमूद केले.

 

या घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू असून पालकांनीही शाळा प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत जागरूकता आणि जबाबदारी वाढवण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

जामिनावर बाहेर येताच पुण्यात रील स्टारची ‘दबंग’गिरी! महागड्या गाड्यांवर जीवघेणा स्टंट,घोड्यांचाही वापर; हुल्लडबाजीमुळे नागरिक हैराण…

Saturday, 10 October 2026, 11:59

ना फोन, ना ठावठिकाणा! थेऊरमधून ३० वर्षीय रिक्षाचालक अचानक बेपत्ता; लोणी काळभोर पोलिसांकडून शोध सुरू

Saturday, 10 October 2026, 11:57

मध्ये आला तर मुडदा पाडतो!’ म्हणत पसरवली दहशत अन् तरुणाने भांडण सोडवणाऱ्या व्यक्तीवर केला लोखंडी हत्याराने हल्ला; मांजरीतील घटना

Saturday, 10 October 2026, 11:36

पुण्यात एमपीएससी आंदोलनप्रकरणी आणखी 5 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 10 October 2026, 11:22

अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात! दिल्ली विमानतळावर हाय व्होल्टेज ड्रामा; विमान लँड होताच पोलिसांनी घेरलं, नेमकं काय घडलं?

Saturday, 10 October 2026, 11:16

ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतलं? अचानक पोलीस पोहोचले अन्…

Saturday, 10 October 2026, 11:02
Next Post
Murlidhar Mohol: Muralidhar Mohol in trouble over land sale of Jain boarding house in Pune? Serious allegations of land grabbing

Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीवरुन मुरलीधर मोहोळ अडचणीत? जागा हडपल्याचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp