Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह, नंतर पत्नीला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या आरोपीला जमीन मंजूर

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 1 August 2024, 17:36

पुणे : प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह करून पत्नीला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह काही अटी व शर्थीवर जामीन मंजूर केला आहे. हे आदेश न्यायाधीश एस. आर. नरवडे यांनी दिले आहेत.

 

तुकाराम नारायण पांचाळ (वय-25, नऱ्हे, पुणे) असे जामीन मंजूर झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका विवाहितेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सदर घटना ही नऱ्हे परिसरात जानेवारी 2024 ते 9 मे 2024 या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता आणि आरोपी तुकाराम पांचाळ हे दोघेजण एकाच ठिकाणी काम करीत होते. आरोपीने प्रेम असल्याचे सांगून पिडीता यांना लग्नाची मागणी केली. त्यावेळी पिडीता यांनी जात वेगळी असल्याने नकार दिला होता. मात्र आरोपी तुकाराम पांचाळ याने लग्नाचा तगादा लावला. त्यानंतर दोघांचे लग्न ताडीवाला रोड परिसरातील बौद्ध विहारात झाले.

दरम्यान, विवाहाच्या काही दिवसानंतर पतीने पिडीतेला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरवात केली. या मारहाणीत पिडीतेने दोनदा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला आहे. त्यानंतर आरोपी पांचाळ याने पिडीतेच्या खात्यातून वेळोवेळी 90 हजार रुपये काढून घेतले. तसेच आरोपीने सोन्याची अंगठी व मंगळसूत्रही हिसकावून घेतले.

याप्रकरणी पिडीतेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी तुकाराम पांचाळ याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीसह (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तुकाराम पांचाळ याला अटक केली होती.

सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात आरोपीने ॲड. स्वप्नील पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या खटल्यात स्वप्नील पाटील यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह काही अटी व शर्थीवर जामीन मंजूर केला आहे. हे आदेश न्यायाधीश एस. आर. नरवडे यांनी दिले आहेत.

दरम्यान, या खटल्यात ॲड. स्वप्नील पाटील यांना ॲड. परमेश्वर काकडे, ॲड. योगेश काकडे, ॲड.मयुर मराठे आणि विनय वजरीनकर यांची विशेष मदत मिळाली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53
Next Post

पिंपरी : हातात बाहुली घेऊन खेळतच आयुष्याचा शेवट..; अंगावर गेट पडून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.