Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात श्रद्धाळू दांपत्याची मोठी फसवणूक! ‘भोंदू बाबा’ आणि ‘शंकर बाबांच्या लेकी’सह तिघांना नाशिकमधून अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 7 November 2025, 16:41
Pune Crime: Big fraud of a devotee couple in Pune! Three people including 'Bhondu Baba' and 'Shankar Baba's daughter' arrested from Nashik

Photo-Social Media

पुणे: धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत पुण्यातील (Pune Crime) एका दांपत्याची तब्बल 14 कोटी (Pune News) रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘शंकर बाबा’ अंगात येतात असा दावा करून मुलीच्या आजारावर उपचार होईल, या आमिषाने दांपत्याला फसवण्यात आले. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दीपक जनार्दन खडके, वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर या तिघांना नाशिकमधून अटक केली आहे. आरोपींनी धार्मिक विश्वासाचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून या फसवणुकीत इतर कोण सहभागी आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

पीडित दांपत्य हे खाजगी कंपनीत नोकरी करणारे असून त्यांना दोन मुली आहेत. त्यापैकी एका मुलीस ‘अलोपेशिया’ हा आजार झाला होता, ज्यामुळे तिचे केस वाढत नव्हते. या दांपत्याला भजन आणि धार्मिक कार्यक्रमांची आवड असल्याने ते वेळोवेळी अशा कार्यक्रमांना जात असत. अशाच एका कार्यक्रमात त्यांची ओळख दीपक खडके या व्यक्तीशी झाली. खडके यांनी त्यांची ओळख वेदिका आणि कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली. त्यावेळी वेदिकाबद्दल सांगण्यात आले की ती “शंकर बाबांची लेक” असून तिच्या अंगात देव येतो आणि ती कोणत्याही आजारावर उपाय करू शकते.

वेदिकाने दरबारात ‘शंकर बाबा’ अंगात आल्याचा अभिनय करून त्या दांपत्याला सांगितले की मुलीच्या आजाराचे दोष दूर करण्यासाठी त्यांना सर्व रक्कम तिच्याकडे द्यावी लागेल. तिच्या सांगण्यावरून दांपत्याने घर, शेती, परदेशातील मालमत्ता आणि दागदागिने विकून सुमारे 14 कोटी रुपये वेदिका आणि तिच्या साथीदारांना दिले.

ही फसवणूक तब्बल तीन वर्षे सुरू होती. या काळात वेदिकाने विविध धार्मिक विधींच्या नावाखाली पैसे घेतले. कधी नारळ, सुपारी, दगड घरात ठेवण्याच्या सूचना देऊन ती म्हणायची ही शेवटची पूजा आहे आणि आता सर्व काही ठीक होईल. मात्र, वर्षानुवर्षे गेल्यानंतरही मुलीच्या आजारात काहीही सुधारणा झाली नाही. शेवटी दांपत्याला फसवणुकीचा संशय आला आणि त्यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली.

 

गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करत नाशिकमधून तिघा आरोपींना अटक केली. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की आरोपींनी श्रद्धा आणि अंधविश्वासाचा वापर करून योजनाबद्ध पद्धतीने ही फसवणूक केली. पुढील चौकशीत आणखी काही लोक या रॅकेटमध्ये सहभागी असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डोळ्यांवर पट्टी, तरीही अचूक उत्तरे! लोणी काळभोरच्या 6 वर्षीय चिमुकल्याची भन्नाट कामगिरी ; NiBM अबॅकस प्रशिक्षणाची कमाल

Wednesday, 5 August 2026, 19:32

सासवड येथे खोट्या क्रिप्टोकरन्सीच्या नावाने तब्बल 22 लाखांची फसवणूक ; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

Wednesday, 5 August 2026, 19:10

दौंड पोलिसांचा गुंडांना मोठा दणका; सात गंभीर गुन्ह्यांतील सराईत आरोपी एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध

Wednesday, 5 August 2026, 18:43

बीड जेलमध्ये ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’चा आरोप; वाल्मिक कराडला नागपूरला हलवा, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Wednesday, 5 August 2026, 18:15

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयावरच भविष्य ठरणार; कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा दावा!

Wednesday, 5 August 2026, 17:52

धानोरीच्या राखीव वनात ‘मियावाकी’ हरितक्रांती; वनविभागाकडून स्थानिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ

Wednesday, 5 August 2026, 17:41
Next Post
Dhananjay Munde: Dhananjay Munde's response to the Manoj Jarange case; 'Have I become the Covid virus? What is the meaning behind Munde's statement?'

Dhananjay Munde: मनोज जरांगेंच्या आरोपाला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले मी काय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.