Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यात ‘भानामती’चा खेळ; बंद घरासमोर हळद-कुंकू, लिंबू-नारळ! संपूर्ण घटना CCTV मध्ये झाली कैद!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 December 2025, 14:58
Pune Crime

photo-social media

Pune Crime : पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काळा जादू, भानामती केल्याच्या धक्कादायक प्रकार घडताना दिसताय. खेड तालुक्यातील कडूस गावात भरदिवसा जादूटोणा केल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. (Pune Crime)

नेमका काय प्रकार घडला?

गावातील एका जुन्या आणि बंद घराच्या दाराजवळ एक पुरुष आणि चेहरा झाकलेल्या अवस्थेतील एक महिला जादूटोणा करत असतानाचा संपूर्ण प्रकार थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये, पुरुषाच्या हातात पिशवी असून, त्याने पिशवीतील साहित्य काढून घरासमोर मांडण्यात आलं आहे. या साहित्यामध्ये दही-भात, लिंबू, हळद-कुंकू आणि नारळ यांसारख्या साहित्यांचा समावेश होता. या व्यक्तीने लिंबूवर हळद-कुंकू लावून, त्या ठिकाणी नारळ फोडल्याचेही फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहे. ज्यामुळे अंधश्रद्धेच्या या कृत्याबद्दल ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक नागरिकांनी हे विचित्र कृत्य पाहून काळाजादू करणाऱ्या पुरुषाला जाब विचारला असता, त्याने आपण मुंबईतून आल्याचे सांगितले. मात्र, ही पूजा कोणत्या उद्देशाने आणि कुणासाठी केली, याबाबत त्याने कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. भर गावात आणि भर दिवसा अशा प्रकारचं कृत्य झाल्यामुळे कडूस गावात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये मात्र, हा प्रकार जमिनीच्या वादातून कुणाला धमकावण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी केला गेला असल्याची जोरदार चर्चा आहे, ज्यामुळे घटनेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी केली कारवाई

स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. हा संपूर्ण प्रकार अंधश्रद्धेपोटी केलेला जादूटोणा आहे की, जमिनीच्या वादातून केलेली ही युक्ती आहे, या दोन्ही शक्यता गृहीत धरून पोलीस कसून तपास करत आहेत. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे अंधश्रद्धा पसरते आणि सामाजिक वातावरण बिघडते, त्यामुळे पोलिसांनी या व्यक्तींवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात चक्क बुरखा घालून ज्वेलर्सच्या दुकानात घुसले पुरुष! कोयते-बंदुका काढून थरार अन् शेजारचा दुकानदार ओरडताच….

Sunday, 18 October 2026, 14:42

पुण्यात सख्ख्या भावाचं बहिणीसोबत निर्दयी कृत्य! किरकोळ वाद टोकाला जाताच डोकं सटकलं अन् असं काही केलं की…

Sunday, 18 October 2026, 14:32

नूडल्स नव्हे, तर मालमत्तेचा वाद? 5 मृत्यूंच्या प्रकरणात व्हॉइस नोटचा मोठा खुलासा; तिघे ताब्यात

Sunday, 18 October 2026, 13:54

वाघोलीत त्रिंबक कांबळेंना पोलिसांशी अरेरावी भोवली! शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 13:22

वाहनाचे हप्ते थकल्याचे सांगून कार अडवली; गाडीमध्ये वकील असल्यामुळे कार चोरीचा प्रयत्न फसला !

Sunday, 18 October 2026, 12:34

इन्स्टावर ओळख, प्रेमविवाह अन् धक्कादायक शेवट!पत्नीचे खासगी व्हिडीओ आई-वडिलांना पाठवले अन्…,पतीच्या कृत्याने खळबळ!

Sunday, 18 October 2026, 12:21
Next Post
Amol Mitkari On Ajit Pawar

Amol Mitkari On Ajit Pawar: मोठी बातमी..! लवकरच अजित पर्व.., दादा मुख्यमंत्री होणार? अमोल मिटकरींच्या दाव्याने राजकारणात खळबळ 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp