Pune Crime: वाशीतील सेक्टर 26 येथे काही महिन्यांपूर्वी एका विवाहीत महिलेने राहत्या घरात आत्महत्या (Suicide) केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पुढील तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासात महिलेने विश प्राशन करून स्वत:चे आयुष्य संपवले होते. आता या घटनेला काही महिने उलटून गेल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेनंतर नवी मुंबईतील वाशी भागात एकच खळबळ उडाली होती. (Pune Latest Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे मागील काही वर्षांपासून शाळेतील एका मित्रासोबत प्रेम संबंध होते. तेव्हापासून ते अनैक प्रेम संबंधात होते. त्यानंतर तीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत झाले. ती आपल्या पती आणि मुलांसोबत वाशीत राहत होती. लग्न झाल्यानंतर ही महिला आपल्या प्रियकराशी बोलायची. त्यांच्या संपर्कात होती. त्याच्यात प्रेम संंबंध सुरु होते. प्रेमा पोटी तीने नवऱ्याला सोडून दिली. महिला नवऱ्यापासून विभक्त राहत होती. नवऱ्यापासून विभक्त राहिल्यानंतर एकट्या महिलेला तिच्या प्रियकऱ्याने स्वीकारण्या मनाई केली.
महिलेने खूप प्रयत्न केले परंतू प्रियकराने तिला आणि तीच्या मुलांना स्वीकारण्यास मनाई केली. या कारणावरून दोघे ही एकमेकांशी भांडायला लागले. अनेकदा तीला शिवीगाळ करून तीचा मानसिक छळ करत राहिला.याच जाचाला कंटाळून महिलेने राहत्या घरी १९ जुलै रोजी आत्महत्या केली.
या घटनेची पोलिसांनी नोंद घेत तपास सुरु केला. मृत महिला आणि तिचा प्रियकराचे सर्व फोन रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले. तपासात आरोपीला मुंबई येथून पकडण्यात आले. आरोपीवर महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासात महेश तपासे (35) अशी आरोपीची ओळख समोर आली आहे.







