Viral News: गुजरात: चोरीच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात. बहुतांश वेळा पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचे प्रकार समोर येतात. मात्र अलीकडे समोर आलेली एक घटना अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीने चक्क महिलांची अंतर्वस्त्रे चोरल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे संबंधित महिलेचे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे.

या दाम्पत्याच्या लग्नाला तब्बल 30 वर्षे झाली आहेत. इतकी वर्षे एकत्र संसार केल्यानंतर पत्नीला पतीचे हे गुपित समजल्याने ती मानसिकदृष्ट्या हादरली आहे. महिलेने सांगितले की, आपल्या नवऱ्याला महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत वेगळे आकर्षण आहे, याची तिला कल्पना होती. मात्र या आकर्षणासाठी तो चोरी करेल, तेही आपल्या ओळखीच्या लोकांच्या घरातून, याचा तिने कधीच विचार केला नव्हता.
या महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा त्यांच्या जवळच्या महिलांचीच अंतर्वस्त्रे चोरत होता. यामध्ये महिला नातेवाईक, मैत्रिणी तसेच शेजारी राहणाऱ्या महिलांचा समावेश आहे. अनेक वेळा घरात किंवा ओळखीच्या ठिकाणी जाताना तो संधी साधून ही चोरी करत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
या घटनेबाबत संबंधित महिलेने एका वेबसाईटवर आपली व्यथा मांडली आहे. तिने आपल्या पतीला ‘पँटी थीफ’ असे संबोधत संपूर्ण प्रकार सांगितला आहे. या सत्यामुळे तिचा विश्वास तुटला असून समाजात कसे वावरायचे, नातेसंबंध कसे सांभाळायचे, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला आहे. इतकी वर्षे एकत्र घालवल्यानंतर आता पुढे काय करावे, हा मोठा संभ्रम तिच्या मनात आहे.
ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून अनेक जण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ही घटना गुजरात येथील असल्याचे एका हिंदी वेबसाईटने सांगितले केले आहे. काही जण या प्रकाराला मानसिक विकृती म्हणत आहेत, तर काही जण महिलेला योग्य निर्णय घेण्याचा सल्ला देत आहेत. या विचित्र घटनेमुळे वैवाहिक नात्यातील विश्वास किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





