Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या ग्रामदैवताच्या मंदिरातच चोरी! कसबा गणपती मंदिरातील दानपेटी मध्यरात्री कुलूप तोडून साफ, 60 हजार गायब

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 7 October 2026, 8:07

पुणे : पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या कसबा पेठेतील श्री गणपती मंदिरात चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मंदिरात ठेवलेली दानपेटी फोडून चोरट्याने त्यातील सुमारे 60 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

पोलिसांनी संग्राम राजेंद्र जाधव (वय 29, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे. मंदिर बंद झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तो परिसरात आला. त्याने मंदिराच्या प्रवेशद्वारावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील दानपेटीचे कुलूपही फोडले आणि त्यातील रोख रक्कम घेऊन तेथून निघून गेल्याचे तपासात समोर आले आहे.

 सोमवारी रात्री पूजा आणि इतर धार्मिक विधी झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले होते. याच संधीचा फायदा घेत चोरी करण्यात आल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी पहाटे पुजारी मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी मंदिराचे कुलूप तुटलेले आणि दानपेटीची तोडफोड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मंदिराच्या विश्वस्तांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही कळवण्यात आले.

 

माहिती मिळताच फरासखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले आणि सहपोलिस आयुक्त संजय दराडे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. उपलब्ध पुरावे आणि तपासादरम्यान पोलिसांनी संग्राम जाधव याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चोरीमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास फरासखाना पोलिसांकडून सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

जेवणात किडे, प्लास्टिक अन् धातूची तार! पुणे विद्यापीठातील मुलींच्या मेसमध्ये नेमकं काय चाललंय? FDAकडून तपासणी

Wednesday, 7 October 2026, 8:51

हिंजवडीतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? लक्ष्मी चौकात होणार उड्डाणपूल; डिसेंबरमध्ये काम सुरू होण्याची शक्यता

Wednesday, 7 October 2026, 8:40

पोलिसांचा धडाका! 15 दिवसांत 247 आरोपी जेरबंद; पिंपरी-चिंचवडमधील ‘मिशन वॉन्टेड’चा मोठा परिणाम

Wednesday, 7 October 2026, 8:20

पुण्याच्या ग्रामदैवताच्या मंदिरातच चोरी! कसबा गणपती मंदिरातील दानपेटी मध्यरात्री कुलूप तोडून साफ, 60 हजार गायब

Wednesday, 7 October 2026, 8:07

Pune: “भाजी गरम केली नाही” एवढ्यावरून पतीचा पारा चढला; पुढच्या क्षणी पत्नीच्या डोक्यात मारली तांब्याची बाटली; मुलीलाही मारहाण

Wednesday, 7 October 2026, 7:55

महाराष्ट्रात हवामानाचा डबल गेम! कुठे वादळी वारे, तर कुठे वाढणार उन्हाचा चटका?

Wednesday, 7 October 2026, 7:40
Next Post

पोलिसांचा धडाका! 15 दिवसांत 247 आरोपी जेरबंद; पिंपरी-चिंचवडमधील ‘मिशन वॉन्टेड’चा मोठा परिणाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp