Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील, ज्योती देवरेसह 15 महसूल अधिकारी सक्तीच्या रजेवर; सातबारात बदल करणं भोवलं

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 26 March 2026, 15:59

संदीप बोडके
पुणे, ता. 26 : महसूल अभिलेखांमध्ये कलम 155 चा गैरवापर करून सातबारावर जमिनीचा वर्ग, क्षेत्रफळ आणि मालकीत फेरफार केल्याच्या आरोपांवरून राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत 15 महसूल अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या कारवाईत पुण्यातील तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील, रवींद्र सबनीस, ज्योती देवरे आणि गीता गायकवाड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

 

या प्रकरणात एकूण 152 अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. त्यापैकी 15 जणांवर प्रथम टप्प्यात कठोर कारवाई करण्यात आली असून उर्वरित ‘ब’ व ‘क’ वर्गवारीतील 137 अधिकाऱ्यांवर पुढे काय कारवाई होणार, याकडे नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या समितीने तपासलेल्या 2,337 प्रकरणांपैकी 13 प्रकरणे ‘अ’ वर्गवारीतील अतिगंभीर असल्याचे अधोरेखित केले आहे. या निष्कर्षानंतर राज्य शासनाने या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत कारवाईची प्रक्रिया गतीमान केली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच दोषी अधिकाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसारच 152 पैकी 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून शासनाने कठोर भूमिकेचा पहिला ठोस निर्णय घेतला आहे. सातबारातील फेरफार प्रकरणामुळे जमीन व्यवहारांबाबतचा विश्वास डळमळीत झाल्याची चर्चा सुरू असून, या कारवाईमुळे महसूल प्रशासनात पारदर्शकता आणि शिस्त प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

सक्तीच्या रजेवर आदेश निर्गमित झालेल्या पंधरा अधिकाऱी व कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे

1) गीता गायकवाड (तत्कालीन अपर तहसीलदार, पिंपरी चिंचवड), उपजिल्हा निवडणूक अधिकारी,
2) श्रीमती ज्योती देवरे (तत्कालीन तहसीलदार, खेड), अपर तहसीलदार, मालेगाव (नाशिक),
3) रविंद्र सबनीस (तत्कालीन तहसीलदार, जुन्नर), (तहसीलदार व सहाय्यक प्राध्यापक), रामेती (RAMETI) पुणे, प्राचार्य, रामेती, पुणे,
4) व्यंकटेश माधवराव भोसले (तत्कालीन मंडळ अधिकारी, जुन्नर, मंडळ अधिकारी, आंबेगाव),
5) प्रल्हाद पाटील (तत्कालीन महसूल सहायक, जुन्नर)महसूल सहायक, आंबेगाव),
6) श्रीकांत पाटील (तत्कालीन तहसीलदार, इंदापूर), विशेष भूसंपादन अधिकारी, धाराशिव,
7) मलाप्पा तम्मा ढाणे (तत्कालीन मंडळ अधिकारी, बावडा, इंदापूर, मंडळ अधिकारी, जुन्नर),
8) मधुसुधन बर्गे (तत्कालीन तहसीलदार, मावळ), उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), नागपूर,
9) मारुती महादेव चोरमले (तत्कालीन मंडळ अधिकारी, शिवणे, मावळ) सध्या निलंबित (15-07-2025 पासून),
10) अश्विनी व्यंकटराव गोरे (तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी, शिवली, मावळ), ग्राम महसूल अधिकारी, शिवली, मावळ),
11) सुजाता गोविंदराव रच्चेवार (तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी, कुरवंडे, मावळ), ग्राम महसूल अधिकारी, वराडे, मावळ,
12) श्रीकांत कुलकर्णी (तत्कालीन लिपिक, मावळ), महसूल सहायक, तहसीलदार कार्यालय, पुणे शहर),
13 सुरेश सोपानराव जगताप (तत्कालीन मंडळ अधिकारी, खडकाळा), सहाय्यक महसूल अधिकारी, खनिकर्म शाखा, पुणे,
14 ज्ञानेश्वर सुदाम भराटे (तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी, तळेगाव ढमढेरे), ग्राम महसूल अधिकारी, पाषाण (हवेली),
15 संजय पाटील (तत्कालीन तहसीलदार, दौंड), उपजिल्हाधिकारी (करमणूक कर), मुंबई शहर,

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Indapur

Indapur : इंदापूर नगरपरिषदेचा ऐतिहासिक ‘वन स्ट्रोक’ निर्णय! 78 कामगारांच्या खात्यात 1.57 कोटी जमा; नगराध्यक्ष भरत शहांचा मोठा पुढाकार

Thursday, 9 April 2026, 15:33

बॉक्स ऑफिसवर पुन्हा धडाका! विजय-रश्मिकाची जोडी ‘या’ मोठ्या सिनेमातून परतणार; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह

Thursday, 9 April 2026, 15:22

एक-दोन नव्हे तर तब्बल 35 गुन्ह्यांचा कुख्यात सराईत अखेर जेरबंद! खेड पोलिसांची मोठी कामगिरी; तीन खुनांचे गुन्हे उघड

Thursday, 9 April 2026, 14:54

शिरूरमध्ये एटीएसची धडक कारवाई! गावठी पिस्टलसह दोघे जेरबंद; मोठा कट उधळला?

Thursday, 9 April 2026, 14:29
Crime

Crime : पोलिसांकडूनच महिलेची लूट? 7 लाखांसाठी रचले ‘असे’ चक्रव्यूह; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीने पोलीस दलात खळबळ

Thursday, 9 April 2026, 14:22

तरुणांनो सुवर्णसंधी! महाराष्ट्र सरकार देणार दरमहा मोठी संधी; ‘मुख्यमंत्री फेलोशिप 2026’ जाहीर, असा करा अर्ज

Thursday, 9 April 2026, 14:14
Next Post

“जय श्रीराम”च्या घोषात दुमदुमला रामदरा; लाखो भाविकांनी घेतला महाप्रसाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.