Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 April 2026, 17:41

पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क-बंडगार्डन परिसरातील वाहतुकीची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या साधू वासवानी पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामावरून प्रशासन आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पुलाच्या कामाला होत असलेल्या प्रचंड विलंबावरून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिकेला थेट आदेश देत संबंधित कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

 

पुलाचे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दीड वर्ष उलटूनही प्रकल्पाचे ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. तीन प्रमुख खांबांचे काम अजूनही अपूर्ण असल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या विलंबामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून कोरेगाव पार्क, बंडगार्डन, नॉर्थ मेन रोड आणि साधू वासवानी चौक येथे दररोज प्रचंड कोंडी होत आहे. प्रवासाचा वेळ तिपटीने वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने या विलंबाचे खापर तांत्रिक अडचणी आणि रेल्वे प्रशासनावर फोडले आहे. प्रकल्पाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १००० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे स्थलांतर आणि रेल्वे ट्रॅकजवळील कामामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. रेल्वे विभागाकडून ‘ओपन वेब गर्डर’ डिझाइनमध्ये बदल सुचवण्यात आल्याने मंजुरी प्रक्रियेत जवळपास ९ महिने विलंब झाला.

तसेच, काम सुरू करण्यापूर्वी जलवाहिन्या, वीजवाहिन्या आणि रेल्वे परवान्यांचा समन्वय साधला गेला नसल्याचेही समोर आले आहे. साउथ मेन रोडकडे जाण्यासाठी सहा मीटर रुंदीचा पर्यायी मार्ग देण्याचे आश्वासनही पाळले गेले नाही. याशिवाय, वाहतूक वॉर्डन काढून घेतल्याने वाहतूक पोलिसांवर अतिरिक्त ताण पडला आहे.

अधिकृतरित्या या प्रकल्पासाठी २४ महिन्यांची मुदत असून मे २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र सध्याची संथ गती पाहता हे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने जबाबदारी निश्चित करून ठोस कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.