Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: मोठी बातमी! शिंदेंच्या नाही तर थेट भाजपच्या गटात; संजय भोसलेंच्या पक्षांतराने पुण्यात राडा, नक्की काय घडलं येरवड्यात?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 12:36

Pune Politics: पुणे:  पुण्यातील शिवसेनेचे (यूबीटी) माजी नगरसेवक संजय भोसले यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर येरवडा-गांधीनगर परिसरात राजकीय वातावरण तापले आहे. भोसले यांच्या पक्षप्रवेशाला शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवत रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

हेही वाचा- मुंढवा जमीन घोटाळ्यात ‘ऑफिस बॉय’च निघाला मास्टरमाइंड! कागदपत्र असे फिरवले की … तपासात धक्कादायक खुलासा

निदर्शनांच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी संजय भोसले यांच्या फोटोंवर पाय देत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भोसले यांना गद्दार संबोधण्यात आले. कार्यकर्त्यांचा रोष पाहता परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे संजय वाल्हेकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही गेल्या 35 वर्षांपासून येरवडा परिसरात काम करत असून शिवसेना घराघरात पोहोचवली आहे. या भागातून अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. संजय भोसले हे देखील त्यापैकीच एक असून कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर ते तीन वेळा नगरसेवक झाले.

वाल्हेकर यांनी आरोप केला की, सत्तेच्या लालसेपोटी भोसले यांनी पक्ष सोडला आहे. जर त्यांनी गेल्या 15 वर्षांत प्रभागात ठोस विकासकामे केली असती, तर आज त्यांना भाजपमध्ये जाण्याची वेळ आली नसती. प्रत्येक निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात आला असून आता महायुतीतील इतर इच्छुक उमेदवारांवरही अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

येरवडा-गांधीनगर परिसरातील जनता येत्या निवडणुकीत संजय भोसले यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. या घटनेमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36
Next Post
Raj Thackeray Udhhav Thackeray: A new era begins! 'We came together after 18 years, to stay together' Brothers greet Balasaheb; Wave from mother, tears welled up in entire Maharashtra

Raj Thackeray Udhhav Thackeray: नव्या पर्वाला सुरुवात! '18 वर्षांनंतर एकत्र आलो, ते एकत्र राहण्यासाठी' भावांचं सोबत बाळासाहेबांना अभिवादन; आईकडून ओवाळणी, संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे पाणावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.