पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू (Pune Politics) असलेल्या गुप्त बैठका आणि चर्चांनंतर (Pune Election) अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तोडगा निघाला आहे. पिंपरी-चिंचवडनंतर (Sharad Pawar) आता पुण्यातही काका-पुतणे एकत्र आल्याचे स्पष्ट झाले आहे. चिन्ह आणि जागावाटपाबाबत (Ajit Pawar) सुरू असलेल्या वादावर अखेरच्या बैठकीत यशस्वी मार्ग काढण्यात आला असून पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. (Latest Marathi News)

पुणे महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 110 जागा देण्यात आल्या आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 50 जागा देण्यात आल्या असून उर्वरित 5 जागा इतर पक्षांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपापल्या अधिकृत चिन्हावरच निवडणूक लढवणार आहेत. पुण्यात घड्याळ आणि तुतारी या दोन्ही चिन्हांवर निवडणूक होणार आहे.
याबाबतची माहिती अजित पवार गटाचे राज्य प्रवक्ते विकास पासलकर यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी यापूर्वीच केली होती. तळवडे येथून प्रचाराची सुरुवात करताना त्यांनी आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुण्यातही दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर जागावाटपावर अंतिम सहमती झाली. मात्र या फॉर्म्युल्यात शरद पवार गटाने काहीशी माघार घेतल्याचे चित्र दिसत आहे. तरीही दोन्ही पक्षांमध्ये समन्वय ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या प्रभागात ज्या पक्षाचे उमेदवार संख्येने अधिक असतील, त्या ठिकाणी तेच चिन्ह वापरण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या प्रभागात अजित पवार गटाचे 3 उमेदवार आणि शरद पवार गटाचा 1 उमेदवार असेल, तर त्या प्रभागात सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील. तर ज्या प्रभागात दोन्ही गटांचे प्रत्येकी 2 उमेदवार असतील, तेथे घड्याळ आणि तुतारी ही दोन्ही चिन्हे वापरण्यात येणार आहेत. या फॉर्म्युल्यामुळे पुण्यातील निवडणूक लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.






