Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: लोककलावंतांचा आम्हास अभिमान – उल्हास पवार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 February 2026, 17:35

Pune News:  पुणे: लोककलांना एक समृद्ध इतिहास आहे. या लोककलेची उपासना करणाऱ्या सर्व लोककलावंतांचा आम्हाला अभिमान आहे. पारंपरिक लावणी आणि लोककला महोत्सवाच्या माध्यमातून ही अस्सल लोककला लोकांपर्यंत पोहोचत आहे. ही लोककला अधिक वृद्धिंगत व्हावी, अशा सदिच्छा ज्येष्ठ विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केल्या.

 

पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव आणि इतर पुरस्कारांचे वितरण महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी यांना शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये 21 हजार रुपये रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच लावणी नृत्यांगना प्रमिला लोदगेकर यांना नामचंद पवळा पुरस्कार, तर शाहीर आप्पासाहेब उगले यांना तमाशा साहित्यिक बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार देण्यात आला. या दोन्ही पुरस्कारांमध्ये प्रत्येकी 15 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हार्मोनियम वादक सुधीर जावळकर यांना शंकरराव घोटकर स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच राम, लखन आणि श्रीकृष्ण रेणुकर या मृदंग व तबला वादक कलावंतांना विशेष गुणगौरव स्मृतिचिन्ह देण्यात आले.

उल्हास पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त कलावंतांच्या वतीने त्यांना कलावंतांचे आश्रयदाते हे मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी महापौर व नगरसेवक प्रशांत जगताप, नगरसेविका उज्वला जंगले, नगरसेवक नितीन गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, नलिनी कुलकर्णी, छाया जिंतीकर, किरण जिंतीकर, केदार जिंतीकर, छाया कांबीकर, सुरेखा पवार, सुरेश घुले, जयप्रकाश वाघमारे, झांबरे, डॉ. शंतनू जगदाळे, बापू जगताप, रवींद्र चव्हाण, कृष्णा ढेरंगे, रेश्मा परितेकर, राम खोमणे, संदीप घुले, बाळासाहेब केमकर, प्रमोद रणनवरे आणि पप्पू बंड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झांबरे यांनी केले, आभार प्रदर्शन डॉ. जगदाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव दीपक वाघमारे यांनी केले.

सणसवाडी, मोडनिंब, पुणे, जालना आणि अहिल्यानगर येथील कलावंतांनी या महोत्सवात गण, गवळण, मुजरा आणि लावणीचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी भावूक झाले. त्यांनी सांगितले की, आयुष्यभर या लोककलेची सेवा केली आहे. माझा शेवटचा श्वासही रसिकांसमोर ही लोककला सादर करतानाच व्हावा, अशी माझी इच्छा आहे. ढोलकी वादनाच्या माध्यमातून मी आयुष्यभर रसिकांची सेवा केली असून शेवटच्या श्वासापर्यंत ही सेवा करत राहणार, असे त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात टँकर ठरतोय ‘यमदूत’! वानवडीत महिलेचा भीषण अपघातात मृत्यू, 48 तासांत दोन बळी गेल्याने शहरात खळबळ

Tuesday, 7 April 2026, 13:02

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Tuesday, 7 April 2026, 12:45

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25

बायको-पोराला संपवू अन् इन्शुरन्सच्या पैशात मजा करू! 3 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं, तर पत्नीची हातोड्यानं ठेचून केली निर्घृण हत्या

Tuesday, 7 April 2026, 12:21

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52
Next Post
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.