Thursday, March 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: “हवेलीला पहिल्यांदाच समाजकल्याण अध्यक्षपदाची संधी? शीतल कांबळे–जितेंद्र बडेकर यांच्यात जोरदार चुरस”

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 10 March 2026, 14:24

Pune News: पुणे, ता. 10 : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने 73 पैकी तब्बल 51 जागा जिंकत जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध सभापती पदांच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे समाजकल्याण विभागाचे अध्यक्षपद यंदा प्रथमच हवेली तालुक्याच्या वाट्याला येणार का, याबाबत जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

हवेली तालुक्याला आतापर्यंत जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाचे अध्यक्षपद कधीही मिळालेले नाही. मात्र यंदाच्या निवडणुकीत हवेली तालुक्यातील दोन सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातून विजयी झाल्याने या पदासाठी हवेलीचा दावा अधिक मजबूत बनत आहे. लोणी काळभोर-कदमवाकवस्ती-वडकी गटातून शीतल सुजित कांबळे आणि उरुळी कांचन-सोरतापवाडी गटातून जितेंद्र बाळासाहेब बडेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आले आहेत. त्यामुळे समाजकल्याण विभागाच्या अध्यक्षपदासाठी या दोघांमध्येच थेट चुरस निर्माण झाली आहे. हवेली तालुक्याला यंदा हे महत्त्वाचे पद मिळाले, तर तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच अशी नोंद होणार असल्याने स्थानिक राजकारणातही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे कामकाज सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग व समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून चालते. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून अनुसूचित जाती तसेच इतर वंचित घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. वस्ती विकास, शिष्यवृत्ती, वसतिगृह सहाय्य, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन, वृद्धाश्रम योजना, दिव्यांग कल्याण तसेच रोजगार व कौशल्यविकास उपक्रम यामध्ये प्रमुखत्वाने समाविष्ट आहेत.

जिल्हा परिषद आपल्या उत्पन्नातील किमान 20 टक्के निधी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी खर्च करते. वस्ती विकासासाठी 4 ते 40 लाखांपर्यंत निधी दिला जातो, तर आंतरजातीय विवाहासाठी 50 हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध आहे. दिव्यांग व यशवंत निवारा योजनेंतर्गत घरकुलासाठी 1.20 लाख रुपये सहाय्य दिले जाते. तसेच ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा 12 ते 14 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. ‘समाजमंदिर ते ज्ञानमंदिर’ या योजनेतून समाजमंदिरांना ग्रंथालय व डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही राबविला जात आहे.

दरम्यान, राजकीय समीकरणे, गटबाजी आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्याला समाजकल्याण विभागाचे अध्यक्षपद मिळते का, तसेच जिल्हा परिषदेत सत्ता मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे कशी जुळतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जोरदार चुरस

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीही राजकीय वातावरण तापले असून या पदासाठी अनेक दिग्गजांच्या वारसांनी दावा केला आहे. अध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात, इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे, तसेच भोरचे माजी आमदार काशिनाथ खुटवड यांचे चिरंजीव विक्रम खुटवड हे इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याशिवाय माजी मंत्री व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील तसेच दौंड तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे यांचीही नावे अध्यक्षपदासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूकही अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच समाजकल्याण विभागाचे अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत अंतिम निर्णय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्या पुन्हा एकदा राजकीय घराण्यांवर विश्वास दाखवणार की नव्या चेहऱ्यांना संधी देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अरुण तुपेंनंतर आता प्रसिद्ध रीलस्टार काजलचा मृत्यू; वर्ध्यात मोठी खळबळ

Thursday, 12 March 2026, 14:04

उन्हाळ्यात ‘चटपटीत’ खावेसे वाटते का? जाणून घ्या त्यामागचे कारण

Thursday, 12 March 2026, 13:38
Pune

Pune : भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद! दुरुस्तीसह भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाचे मोठे पाऊल; वाचा सविस्तर.

Thursday, 12 March 2026, 13:38

Pune News : पुणे ते शिरूर आता फक्त काही मिनिटांत, देशातील सर्वात लांब उड्डाणपूल पुणे-नगर महामार्गावर; 31 किमीचा प्रवास होणार सुखकर

Thursday, 12 March 2026, 13:37

एक माणूस, दोन सरकारी नोकऱ्या; 17 वर्षे दोन जिल्ह्यांतून लाटला ‘डबल’ पगार; महाठगाचा प्रताप ऐकून चक्रावेल डोकं

Thursday, 12 March 2026, 13:29
Crime

Crime : पिस्तूल कुणाचे? आणि पार्थने का संपवलं आयुष्य? पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत तरुणाच्या आत्महत्येने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण.

Thursday, 12 March 2026, 12:59
Next Post
Ajit Pawar Plane Crash: VSR Company owner has links with underworld? Amol Mitkari's sensational allegation; Audio clip leaked...

Ajit Pawar Plane Crash: VSR कंपनीच्या मालकाचे अंडरवर्ल्डशी संबंध? अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप; ऑडिओ क्लिपचा गौप्यस्फोट...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.