प्रतिनिधी अमित मुंडीक

Pune News: पुणे: आगामी ३१ डिसेंबर रोजी नूतन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस परिमंडळ–६ अंतर्गत आज दिनांक २९/१२/२०२५ रोजी परिमंडळ–६ कार्यालयात हॉटेल मालक, चालक, मॅनेजर व इव्हेंट मॅनेजर यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस परिमंडळ–६ कार्यक्षेत्रातील एकूण ४८ हॉटेल मालक, चालक व मॅनेजर उपस्थित होते. बैठकीदरम्यान ३१ डिसेंबर रोजी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य ते मार्गदर्शन व निराकरण करण्यात आले.
सदर बैठक पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ–६ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये समन्वय ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.






