पुणे: राज्यात महानगरपालिका (Pune Mahapalika Election) निवडणुकांची घोषणा होण्याच्या (Pune Election) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना (Pune Politics) वेग आला आहे. पुणे महापालिकेसाठी (Murlidhar Mohol) भाजपकडून 165 उमेदवारांपैकी सुमारे 100 उमेदवारांची पहिली यादी (Devendra Fadanavis) तयार करण्यात आली असून ही यादी 26 डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. ही यादी आज प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जाणार असल्याची माहिती आहे. उर्वरित जागांबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. (Latest Marathi News)

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 100 पेक्षा अधिक नावांवर एकमत झाले आहे. मात्र 40 ते 50 जागांवर अद्याप एकमत न झाल्याने ही नावे प्रदेश स्तरावरील नेत्यांकडे पाठवण्यात येणार आहेत. या यादीला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केली जाण्याची शक्यता आहे.
पुण्यात भाजपमधील काही नेते आणि आमदारांचे नातेवाईकही इच्छुक असल्याची चर्चा आहे. मुरलीधर मोहोळ कुटुंबाकडून दुष्यंत मोहोळ, माधुरी मिसाळ कुटुंबाकडून करण मिसाळ, तर दिवंगत गिरीश बापट यांच्या कुटुंबाकडून स्वरदा बापट इच्छुक असल्याची माहिती आहे. यामुळे काही प्रभागांमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना शिंदे गटाने पुण्यातील 34 जागांची मागणी केली असली तरी भाजपने एवढ्या जागा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे युतीतील मतभेद कायम आहेत. पुण्यात एकूण 41 प्रभागांमध्ये 165 जागा असून भाजप 125 जागांवर दावा करत आहे.
दुसरीकडे, मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसही या आघाडीत सहभागी होण्याबाबत विचार करत आहे. शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष घातले असून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेसमध्येही युतीबाबत मतभेद असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






