पुणे: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या (Pune Election) सार्वत्रिक निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार असून, या निवडणुकांमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क (Pune News) बजावता यावा यासाठी प्रशासनाने (Public Holiday) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील संबंधित (PCMC News) नगरपरिषद क्षेत्रात 20 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा
प्रशासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बारामती, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगरपरिषदांच्या मतदारसंघांमध्ये 20 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मतदानासाठी वेळ काढणे सोपे होणार असून मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Breaking News)
सुट्टी जाहीर
या सार्वजनिक सुट्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे तसेच प्रशासनाच्या नियंत्रणाखालील विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मतदारसंघाच्या हद्दीत राहणारे मतदार तसेच कामानिमित्त संबंधित मतदारसंघाबाहेर असलेले मतदार यांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. यासोबतच केंद्र शासनाची शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि इतर संबंधित आस्थापनांनाही 20 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे. (Marathi Batmya)
जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
नगरपरिषदांच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. स्थानिक विकास, नागरी सुविधा आणि प्रशासनावर याचा थेट परिणाम होत असल्याने प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही कारणामुळे मतदान टाळू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना मतदानासाठी अनुकूल वातावरण मिळणार असून शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






