पिंपरी–चिंचवड: पिंपरी–चिंचवड परिसरातील सोमाटणे फाटा येथे आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली. घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी गुन्हे शाखा युनिट–2 च्या पथकावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Pune Crime)

काय घडलं?
गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पहाटेच्या सुमारास घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या तीन संशयितांचा पाठलाग करत होते. तेंव्हा आरोपींपैकी एकाने पिस्तूलातून पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत या गुन्हेगारी टोळीला अटक केली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींवर प्रत्येकी 30 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. सोमाटणे फाटा, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर हा गोळीबाराचा थरार रंगला होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून पुढील तपास सुरू आहे.






