लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत छापा (Loni Kalbhor News) टाकून गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने गांजा तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त शनिवारी (ता.14) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास केले आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन तस्करांना अटक करून ३४ किलो ४४० ग्रॅम वजनाचा गांजा व गांजा तस्करी करण्यासाठी वापरलेली कार असा सुमारे १४ लाख ८३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१, रा. बिल्डींग नंबर ११ फ्लॅट नंबर १०७, नविन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर, पुणे) व विशाल दत्तात्रय जाधव, वय २८, रा. वाडकर यांचे रुममध्ये भाडयाने ओढयाचे जवळ, हिंगणे मळा, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे शहरामध्ये अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयातुन वेळोवेळी सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्या आदेशानुसार १४ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट ५ पथकाचे पोलीस निरीक्षक संदीपान पवार व युनिट ५ तसेच ४ कडील पोलीस स्टाफ असे लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना, कृपासिंधु ईस्ट सोसायटीचे समोर सार्वजनिक रोडवर अक्षय पोपटराव पाडुळे व त्याचा साथिदार विशाल दत्तात्रय जाधव यांना AURA कार क्रमांक MH-12/VT-2000 सह ताब्यात घेतले.
त्यांच्याकडुन विक्री करण्यासाठी आणलेला ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, गांजाची तस्करी करण्यासाठी वापरलेली औरा कार तसेच एकमेकांना संपर्क करण्यासाठी वापरलेले मोबाईल हॅण्डसेट असा एकुण १४ लाख ८३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी व इतर ३ पाहिजे आरोपींविरुध्द लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. यांतील आरोपी अक्षय पाडुळे हा साकीनाका पोलीस स्टेशन, मुंबई येथे खुनाचा प्रयत्न गुन्हयामधील पाहिजे आरोपी असुन तो सुमारे १ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देवुन स्वतःची अटक चुकवित होता.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीपान पवार, गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, वैभव मगदुम, पोलीस अंमलदार नासिर देशमुख, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, शशिकांत नाळे, सुभाष आव्हाड, किशोर दुसिंग, वैभव रणपिसे, उमाकांत स्वामी, स्वाती तुपे, अमर चव्हाण, शहाजी काळे, राहुल ढमढेरे अविनाश इंगळे यांचे पथकाने केली आहे.







