Pune Crime: लोणी काळभोर, ता. 5 : आय लव यु म्हणून महिला कर्मचाऱ्याच्या मॅनेजरने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता हवेली) परिसरात 16 जुलै 2025 ते 3 जानेवारी 2026 यादरम्यान घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमेश्वर साहेबराव शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 29 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता या लोणी काळभोर परिसरातील एका कंपनीमध्ये काम करीत होत्या. तर आरोपी परमेश्वर शिंदे हा त्या कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता.
हेही वाचा- रात्रीच्या शांततेचा फायदा घेतला अन् देवीचा मुकुट चोरला! शिवाजीनगरमधील मांढरदेवी काळूबाई मंदिरात चोरी
एके दिवशी पिडीता या घरी असताना आरोपी परमेश्वर शिंदे याने व्हाटस अपवरुन त्यांना आय लव यु चा मेसेज पाठविला होता. सदरचा मेसेज हा आरोपीने चुकीने पाठविला असेल असा विचार करुन पिडीता यांनी या मॅसेजला रिप्लाय दिला नाही. दुसऱ्या दिवशी पिडीता या नेहमीप्रमाणे ऑफिसवर कामाकरीता गेल्या.
पिडीता काम करीत असताना आरोपी परमेश्वर हा त्यांच्याजवळ आला. आरोपीने पिडीतेचा हात पकडला आणि म्हणाला, मी तुला काल मॅसेज केला होता तू पाहुन देखील मला रिप्लाय दिला नाही, खरचं तु मला खुप आवडतेस” असे म्हणून पिडीत यांच्या मनास लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केला. त्यावेळी पिडीता आरोपीला म्हणाल्या की, तुम्ही करीत आहे ते खूप चुकीचे आहे असे म्हणून समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपी काहीही ऐकण्याचे परिस्थीतीमध्ये नव्हता. त्यामुळे पिडीता ऑफिसमधून घरी रागाने निघून गेल्या.
आरोपी परमेश्वर याच्या वागणुकीमध्ये काहीतरी बदल होईल? असा विचार करुन ऑफिसला दोन ते तिन दिवस सुट्टी घेतल्यानंतर पिडीता पुन्हा कामावर रुजू झाल्या. परंतु, आरोपी परमेश्वर हा पिडीता ऑफिसमध्ये एकटी असताना वारंवार लगट करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीता यांना ऑक्टोंबर 2025 मध्ये सदर काम सोडून दिले. प्रतिष्ठेला घाबरुन पिडीता यांनी आज पर्यंत तक्रार केली नव्हती.
दरम्यान, 3 जानेवारीला आरोपी परमेश्वर शिंदे याने पिडीता यांना कॉल केला. अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करुन म्हणाला की, धंदेवाली तू लफडे लावती, व माझ्या बायकोला काय सांगितले तु. तु घरे जाळायचे कमीशन घेते? अशा आश्लिल भाषेमध्ये शिवीगाळ करुन धमकी दिली.
याप्रकरणी पिडीता यांनी तत्काळ आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी परमेश्वर शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 75.78,79,351, 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करत आहेत







