पुणे : राजकीय वर्तुळात कायम चर्चेत राहणाऱ्या (Navneet Rana) बारामतीत आज एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब आणि उद्योगपती गौतम (Ajit Pawar) अदानी एकत्र दिसले. बारामतीत ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स (Sharad Pawar) इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ या उपक्रमाचे (Pune Politics) उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार कुटुंब एकत्र दिसल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. (Latest Marathi News)

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे. पवार कुटुंब एकत्र आल्यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या की, अजित पवार भाजपसोबत गेले, ही शरद पवारांचीच इच्छा होती. त्यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व घडले असल्याचा दावा त्यांनी केला.
नवनीत राणा यांनी जुन्या घटनांचा उल्लेख करत पहाटेच्या शपथविधीचा दाखला दिला. पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या नियोजनाचाच भाग होता, असा दावा त्यांनी केला. अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन निवडणूक लढवणे आणि मंत्रिपदाची शपथ घेणे, हे सर्व चित्र शरद पवार यांनीच आखले होते, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे आज बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसले, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण हे सर्व आधीच ठरलेले होते, असा आरोप त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी केलेल्या या विधानामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे. अजित पवारांचे बंड हे शरद पवार यांच्याच योजनेचा भाग होता का, या प्रश्नावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.







