Nawale Bridge Accident : गुरुवारी (१३ नोव्हेंबर) पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला. एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि त्याने पुढच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर लगेचच गाड्यांना आग लागली आणि क्षणभरात संपूर्ण परिसर आगीच्या ज्वाळांनी वेढला. या भयानक दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. पण या अपघातानंतर पुलावर जे घडलं, ते मानवतेला काळिमा फासणारं , लाजिरवाण वाटेल असं आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय, आणि त्यानंतर प्रश्न पडतोय तो खरचं माणसातली माणुसकी कुठे तरी हरवत जातेय का असा.. (manuskila kalima)

सोनं-पैसे लुटणाऱ्यांचा धक्कादायक व्हिडिओ
नवले पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातानं मन हेलावल. पण या अपघातात मृत आणि जखमींच्या गाड्यांमधील पैसे, दागिने, सामान रस्त्यावर विखुरलं होतं.
ते पाहताच तिथे जमलेल्या काही लोकांनी पैसे आणि सोनं उचलून स्वतःच्या खिशात टाकायला सुरुवात केली, आणि या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या व्हिडिओत असं दिसतंय की. एका बाजूला लोक जिवासाठी धडपडत होते, तर दुसरीकडे काही जण लूटमार करण्यात व्यस्त होते — हा प्रकार पाहून या विकृत बुद्धीच्या लोकांबद्दल नागरिकांनी आणि नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. @pune _city.lover (pune city lover) या इंस्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ प्रसारीत करण्यात आला आहे.
अपघात कसा झाला?
कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर कंटेनरचा ब्रेक फेल झाला. वाहनाचे नियंत्रण सुटल्यावर त्याने समोरच्या ८–१० वाहनांना उडवलं. पुढे असलेल्या दुसऱ्या कंटेनरला धडक देण्याआधीच एका चारचाकीला धडकल्याने ती कार दोन कंटेनरमध्ये अडकली आणि काही सेकंदांतच ती आगीत सापडली. आगीचे लोण इतके प्रचंड होते की दूरूनही दिसत होते. पोलिस, अग्निशमन दल आणि स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने धाव घेतली, पण चारचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत, कमेंट करत आहेत की, “अपघाताने जीव गेले तरी पुणेकरांची माणुसकी कुठे गायब झाली?” हा प्रश्न विचारला जातोय.







