Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mula-Mutha river : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या कचऱ्यामुळे मुळा-मुठा नदी पेटली; 24 तास धुमसणाऱ्या कचऱ्याने 25 हजार नागरिकांचे आरोग्य टांगणीला

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 February 2026, 11:29

 Mula-Mutha river : लोणी काळभोर, ता. 28 : पुणे महानगरपालिकेचा कचरा लोणी काळभोरकरांच्या माथी मारला जात आहे. तर लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींकडून गावात गोळा केलेला कचरा अनेक वर्षांपासून खुलेआम मुळा–मुठा नदीपात्रात टाकला जात आहे. दोन्ही ग्रामपंचायतींच्या निष्क्रियतेमुळे मुळा–मुठा नदी अक्षरशः कचऱ्याचा ढिगारा बनली आहे. या नदीपात्रातील कचऱ्याला शुक्रवारी (ता. 27) सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली आणि तब्बल 24 तास उलटूनही ती धुमसत राहिली. धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरल्याने एमआयटी विद्यापीठाच्या सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांसह 15 हजार नागरिकांचे आरोग्य टांगणीला लागले आहे.

 

कदमवाकवस्ती व लोणी काळभोर या दोन्ही ग्रामपंचायतींची लोकसंख्या प्रत्येकी 50 ते 60 हजारांच्या घरात आहे. गावात कचरा उचलण्यासाठी काही गाड्या कार्यरत असल्या तरी तो केवळ दिखावा असल्याचे वास्तव समोर येत आहे. ‘आदर पुनावाला स्वच्छ शहर’ मोहिमेअंतर्गत सहा गाड्या कचरा संकलन करत असल्या तरी ग्रामपंचायतींकडे कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीची कोणतीही ठोस यंत्रणा नाही—ना स्वतंत्र कचरा डेपो, ना प्रक्रिया प्रकल्प, ना शासकीय जागा! परिणामी, उचललेला कचरा थेट मुळा–मुठा नदीपात्रात फेकला जात आहे.

मुळा–मुठा नदीपात्रातील कचऱ्याला शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता धुराचे लोट पाच किलोमीटर परिसरात पसरले. विषारी धुरामुळे परिसरात श्वास घेणे कठीण झाले; अनेकांना ठसका, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागला. शैक्षणिक संकुलात आग लागल्याचा समज होऊन काही काळ गोंधळ उडाला; मात्र नंतर हा कचरा जळत असल्याचे स्पष्ट झाले. ही केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी केलेला उघड खेळ आहे. आग नैसर्गिक कारणाने लागली की हेतुपुरस्सर लावली गेली, याची सखोल चौकशी व्हावी आणि जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायतींनी मुळा–मुठा नदीला जणू अधिकृत कचरा डेपोच बनवले आहे. त्यामुळे ही जीवनदायिनी नदी ‘गटारगंगा’ बनून वाहत आहे. नदीतील जलचर प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. नदीलगतच्या पाणीपुरवठा संस्थांच्या कार्यक्षेत्रातील लाखो एकर शेतीवर याचा गंभीर परिणाम होत असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

दरम्यान, कचऱ्याच्या विघटनासाठी काही स्थानिक उद्योजक पुढाकार घेण्यास तयार असतानाही प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळत नाही. गट-तट विसरून शासनस्तरावर पाठपुरावा केल्यास कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा राहू शकतो आणि शेतकऱ्यांना स्वस्त दरात सेंद्रिय खत उपलब्ध होऊ शकते. मात्र यासाठी संकुचित राजकारण बाजूला ठेवून प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागेल. आता प्रश्न एकच आहे—मुळा–मुठा वाचवण्यासाठी आणि नागरिकांच्या जीवितासाठी प्रशासन जागे होणार की आणखी एखाद्या आगीची वाट पाहणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.

धुराच्या पार्श्वभूमीवर विशे कंपनीने कामगारांना दिली सुट्टी

मुळा–मुठा नदीपात्रातील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे परिसरात पसरलेल्या विषारी धुराचा परिणाम लक्षात घेता, विशे कंपनीने तातडीने निर्णय घेत कामगारांना सुट्टी जाहीर केली. धुरामुळे श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपनी प्रशासनाने उत्पादन थांबवत कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य दिले. कंपनीच्या या निर्णयाचे कामगारांनी स्वागत केले आहे. मात्र अचानक जाहीर केलेल्या सुट्टीमुळे कंपनीचे उत्पादन ठप्प झाले असून कंपनीला आर्थिक फटका बसला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सपशेल दुर्लक्ष?

एकीकडे नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या काही गावांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे; मात्र लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींकडून मुळा–मुठा नदीपात्रात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे. पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी करताना दुजाभाव का केला जात आहे? असा तीव्र सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. सर्व ग्रामपंचायतींवर समान निकष लावून कठोर व निष्पक्ष कारवाई करावी; अन्यथा नदीपात्राचे होणारे नुकसान कधीच थांबणार नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

Indapur : इंदापूर नगरपरिषदेचा 2026-27 चा अर्थसंकल्प एकमताने मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.