पुणे: शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या (Maharashtra Teacher’s Salary) रखडलेल्या पगाराचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागातील (Teacher’s Salary) अधिकाऱ्यांनी पुढील 2 दिवसांत पगारपत्रकांवर सह्या (Teacher’s Salary Update) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पगार आता शिक्षकांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Latest Marathi News)

प्रतीक्षा संपली
पगारपत्रकांवर सह्या न करण्याच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे राज्यभरात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संतप्त झाले होते. विविध शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अधिकाऱ्यांच्या संघटनेला बैठकीचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतरच अधिकाऱ्यांनी सह्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
निरपराध अधिकाऱ्यांवर कारवाई
गेल्या वर्षापासून राज्यात बोगस मान्यता आणि बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. या तपासात अनेक गैरप्रकार उघडकीस आले असून काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे तर काहींना निलंबित करण्यात आले आहे. या तपासादरम्यान पगारपत्रकांवर सह्या केल्यामुळे काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही चौकशी न करता निरपराध अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे सांगत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने पगारपत्रकांवर सह्या न करण्याचा निर्णय घेतला होता.
शिक्षण विभाग बॅकफूटवर
डिसेंबर महिन्यात यवतमाळ येथील एका अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सह्यांवर बहिष्कार टाकला होता. एसआयटीच्या आदेशामुळे सह्या करता येत नसल्याचे कारण शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र शिक्षक संघटनांनी या भूमिकेला तीव्र विरोध करत अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.

लवकरच पगार खात्यात जमा होणार
या वादामुळे राज्यभरातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेत अखेर अधिकाऱ्यांनी पगारपत्रकांवर सह्या करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 2 दिवसांत सह्या झाल्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होण्याची शक्यता आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या संघटनेशी राज्य सरकार लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.






