Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : दत्तमंदिरात दर्शनाला गेले अन् चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉपसह पर्स लंपास केली!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 7 November 2026, 12:55

लोणी काळभोर, ता. ७ : दिवाळीची खरेदी करून घरी परतताना गुरुदत्त मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दाम्पत्याची कार चोरट्यांनी लक्ष्य केली. कारची मागील बाजूची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉपची बॅग आणि पत्नीची पर्स असा एकूण १३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (ता. ५) रात्री ७.४५ ते ८.०५ वाजण्याच्या दरम्यान कदमवाकवस्ती येथील दत्तमंदिरासमोर घडली.

याप्रकरणी गणेश बाळासाहेब चौधरी (वय ३८, रा. नायगाव, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चौधरी आणि त्यांची पत्नी अक्षदा हे दोघेही एमआयटी कॉलेजमध्ये नोकरीला आहेत. गुरुवारी कामावरून सुटल्यानंतर दोघेही स्विफ्ट कारने (एमएच १२ डब्ल्यूयू ४४६१) दिवाळीची खरेदी करण्यासाठी फुरसुंगी येथे गेले होते. खरेदी आटोपून घरी परतताना रात्री पावणेआठच्या सुमारास त्यांनी कदमवाकवस्ती येथील दत्तमंदिरासमोर सर्व्हिस रोडवर कार पार्क केली.

कारमध्ये कार्यालयीन बॅग, त्यामध्ये लेनोवो कंपनीचा लॅपटॉप, चार्जर आणि माऊस तसेच पत्नीची गुलाबी रंगाची पर्स ठेवली होती. या पर्समध्ये रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्र होते. दोघेही महामार्ग ओलांडून मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन घेऊन अवघ्या २० मिनिटांनी रात्री ८.०५ वाजता कारजवळ परतले असता, कारच्या मागील डाव्या दरवाजाची काच फुटलेली दिसली. कारची तपासणी केली असता लॅपटॉपची बॅग आणि पत्नीची पर्स गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून सुमारे १० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि तीन हजार रुपये किमतीची पर्स व त्यातील ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस तपास करीत आहेत. दर्शनासाठी अवघ्या २० मिनिटांची अनुपस्थिती चोरट्यांच्या पथ्यावर पडल्याने नागरिकांनी वाहनात लॅपटॉप, पर्स अथवा मौल्यवान वस्तू ठेवून जाताना अधिक काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : दत्तमंदिरात दर्शनाला गेले अन् चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉपसह पर्स लंपास केली!

Saturday, 7 November 2026, 12:55

दिवाळीत पेट्रोल-डिझेल पुरवठ्याचा खोळंबा? पुण्यातील पेट्रोल पंप ड्राय होण्याची भीती!

Saturday, 7 November 2026, 12:51

लोणी काळभोर येथून २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

Saturday, 7 November 2026, 12:48

Diwali 2026: लक्ष्मीपूजन कसे करावे? जाणून घ्या पूजेची संपूर्ण विधी आणि शुभ मुहूर्त

Saturday, 7 November 2026, 12:45

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षांच्या तारखा

Saturday, 7 November 2026, 12:31

बँकॉकहून आलेल्या महिलेकडून पुणे विमानतळावर १.१४ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; कस्टमची कारवाई

Saturday, 7 November 2026, 12:17
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp