Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar-Yavat Elevated Route : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुन्हा एकदा ‘हातोडा’! हडपसर-यवत मार्गावर आता ‘दुहेरी’ कसरत; पुलांच्या उभारणीसाठी सरकारचा ‘मास्टरप्लान’ तयार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 February 2026, 15:54
Hadapsar-Yavat Elevated Route: 'Hammer' once again to break the traffic jam! Now a 'double' exercise on the Hadapsar-Yavat route; Government's 'master plan' ready for the construction of bridges...

पुणे: पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला (Hadapsar-Yavat Elevated Route ) तोडगा काढण्यासाठी रिंग रोडसह महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना (Hadapsar Gadital) प्रशासनाने गती दिली आहे. रिंग रोडच्या पूर्व भागाचे काम 2028 पर्यंत, तर पश्चिम भागाचे काम 2026 पर्यंत पूर्ण (Hadapsar News) करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पूर्व भागातील 12 पैकी 9 पॅकेजेसची कामे सुरू झाली असून उर्वरित 3 पॅकेजेस प्रशासकीय मान्यतेच्या टप्प्यात आहेत. या तिन्ही पॅकेजेसची निविदा प्रक्रिया मेपूर्वी पूर्ण करून ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, हडपसर ते यवत या उन्नत मार्गाच्या प्रस्तावामुळे सोलापूर रस्त्यावरील विद्यमान उड्डाणपुलांवर हातोडा पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गाडीतळ आणि नोबेल हॉस्पिटलजवळील उड्डाणपूल हटवावे लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. उन्नत मार्गाचे रॅम्प या चौकांवर उतरविल्यास वाहतूक सुरळीत होईल, असा युक्तिवाद केला जात आहे.

 

हडपसर-लोणी काळभोर मेट्रो मार्ग आणि हडपसर-यवत उन्नत मार्ग हे एकत्रितपणे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्नत मार्गाच्या वर मेट्रो धावणार असल्याने दुहेरी पूल उभारणीची जबाबदारी महामेट्रोकडे देण्यात आली आहे. हा मार्ग भैरोबा नाल्यापासून सुरू होणार आहे. यापूर्वी पुणे विद्यापीठासमोरील उड्डाणपूल मेट्रोसाठी पाडण्यात आला होता; त्याच धर्तीवर सोलापूर रोडवरील उड्डाणपूल पाडण्याचा पर्याय तपासला जात आहे.

मात्र, सोलापूर रस्त्यावर आधीच प्रचंड वाहनांची वर्दळ आहे. अशा परिस्थितीत विद्यमान पूल पाडून नव्याने उभारणी करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. वाहतूक विस्कळीत न होता प्रकल्प पूर्ण करणे, पर्यायी मार्गांची व्यवस्था आणि नागरिकांना कमीत कमी त्रास देणे ही कसोटी असणार आहे.

रिंग रोड आणि उन्नत मार्ग पूर्ण झाल्यास पुण्याच्या वाहतुकीत मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे; मात्र त्या दिशेने जाणारा प्रवास आव्हानांनी भरलेला असणार, हेही तितकेच स्पष्ट आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Murder: Extortion, atrocities and murder! Valmik Karad, the mastermind in Santosh Deshmukh murder, has had his bail application rejected once again, what happened in the court?

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; आरोपींची उच्च न्यायालयात धाव, दोषारोप रद्द करण्याची मागणी

Thursday, 7 May 2026, 16:40

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 15:01

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22
Next Post

Buldhana News: 17 वर्षीय मुलीचा नदीत सापडला मृतदेह; न्यायालयाच्या इमारतीमागे नेमकं काय घडलं? शहरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.