पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या (Big Breaking) पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून (Pune Politics) शहरात तथाकथित पुणे पॅटर्नची जोरदार (Pune Mahapalika Election) चर्चा सुरू होती. शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार गट (Ajit Pawar) यांच्यात स्थानिक पातळीवर युती होईल, अशी अपेक्षा व्यक्त (Pune NCP) केली जात होती. मात्र आज दुपारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने अजित पवार गटासोबतची बैठक फिस्कटली असून शरद पवार गटाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या साथीनेच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

चिन्हावरून मतभेद
आज दुपारी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात पुणे महापालिकेतील जागावाटपासाठी बैठक झाली. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला केवळ 35 जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. इतकेच नव्हे तर या जागांवरही उमेदवारांनी अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अट घालण्यात आली. हा प्रस्ताव शरद पवार गटाला मान्य नसल्याने युती अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आणि बैठक अर्ध्यावरच संपली.
पुण्यात आता मविआ विरुद्ध महायुती
ही चर्चा फिस्कटताच शरद पवार गटाने तातडीने महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी संपर्क साधला. पुण्यातील हॉटेल शांताई येथे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची संयुक्त बैठक सुरू झाली. या बैठकीमुळे आता पुण्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कार्यकर्त्यांची निराशा
या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख स्थानिक नेते उपस्थित होते. पुणे महापालिकेत काका-पुतण्या एकत्र येतील या आशेवर असलेल्या कार्यकर्त्यांना या घडामोडीमुळे निराशा झाली आहे. मात्र घड्याळ चिन्हावर लढण्यास नकार देत शरद पवार गटाने आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. आता महाविकास आघाडीच्या बैठकीतून जागावाटपाचे नेमके सूत्र काय ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







