Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Death: सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल की सुनील तटकरे? अजितदादांचा राजकीय वारसदार ठरवण्याचं पवार कुटुंबासमोर मोठं आव्हान!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 29 January 2026, 22:33
Ajit Pawar Death: Sunetra Pawar, Praful Patel or Sunil Tatkare? A big challenge for the Pawar family to decide Ajit's political heir!

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar Death) अपघाती निधनाने केवळ राज्याच्या राजकारणालाच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबालाही मोठा (Ajit Pawar) धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हे निधन अशा टप्प्यावर झाले, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका दोन्ही गटांनी एकत्र लढवल्या होत्या, तर आगामी जिल्हा परिषद निवडणुका (Maharashtra Politics) घड्याळ या एकाच चिन्हावर लढवण्यावरही एकमत झाले होते. मात्र आता अजित पवार नसल्याने राष्ट्रवादीच्या भविष्यातील नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

 

अजित पवार यांच्या पश्चात पक्षाची धुरा कोण सांभाळणार, यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. पवार कुटुंबातील सदस्य, अजित पवारांसोबत पक्षफुटीत गेलेले सहकारी आणि दोन्ही गटांना मान्य असलेले नेते यांच्याभोवती ही चर्चा फिरत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव थेट पर्याय म्हणून घेतले जात आहे. बारामतीत महिला गटांच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला, तरी नंतर त्या राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या. मात्र राज्यभरातील संघटनात्मक पकड आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ही त्यांची मर्यादा मानली जाते.

अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनाही वारसदार म्हणून पाहिले जाते. 2019 मध्ये त्यांनी मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना अपयश आले. संघटनात्मक अनुभव आणि राज्यव्यापी नेतृत्वाचा अभाव पाहता त्यांच्याकडे तात्काळ जबाबदारी देणे कठीण मानले जाते.

अजित पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचीही नावे चर्चेत आहेत. प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय पातळीवरील अनुभव आहे, मात्र महाराष्ट्रातील जनाधार मर्यादित आहे. तटकरे कोकणापुरते प्रभावी मानले जातात. धनंजय मुंडेंना मराठवाड्यात पाठिंबा असला, तरी मागील वाद त्यांच्या आड येऊ शकतात. छगन भुजबळांकडे अनुभव असला, तरी वय आणि जुने वाद हे अडथळे ठरू शकतात.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससमोर सर्वात मोठा आणि अंतिम पर्याय म्हणजे शरद पवार. दोन्ही गटांना मान्य असलेले, वरिष्ठ नेत्यांशी वैयक्तिक संबंध असलेले आणि सहकार क्षेत्रावर प्रभाव असलेले शरद पवार नेतृत्व किंवा किमान मार्गदर्शक भूमिकेत पुढे येऊ शकतात. मात्र वयामुळे ते थेट सक्रिय राजकारणाऐवजी मार्गदर्शनाची भूमिका स्वीकारतील, अशी शक्यता अधिक आहे.

एकूणच, दोन्ही राष्ट्रवादी गटांचे विलीनीकरण आणि सर्वांना मान्य होईल असे नेतृत्व उभे करणे, हेच सध्या पक्षासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. हे आव्हान कोण पेलतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post
Daund News: Raids at 3 places in Daund; 12 thousand bottles including three and a half thousand liters of spirit seized, action by the Excise Department

Daund News: दौंडमध्ये 3 ठिकाणी छापेमारी; साडेतीन हजार लिटर स्पिरीटसह 12 हजार बाटल्या जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.