Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : वाहतूक कोंडीला खरंच ‘कलाकार’ जबाबदार? गुडलक चौकच्या कट्ट्यावर पालिकेचा हातोडा पडणार; स्थानिक कलाकार आणि नागरिकांमध्ये ठिणगी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 February 2026, 15:35
Pune

photo- social media

Pune : पुण्यातील गुडलक चौक येथे गेल्या काही वर्षांत उभा राहिलेला ‘कलाकार कट्टा’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात, फुटपाथच्या एका कोपऱ्यात सुरू झालेला हा उपक्रम आता हटवण्याच्या चर्चेमुळे स्थानिक कलाकारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवकांमार्फत पालिका आयुक्तांकडे कट्टा स्थलांतरित करण्याचे निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे.

 

मात्र कलाकारांचा दावा वेगळाच आहे. हा कट्टा रस्त्याच्या मधोमध नसून फुटपाथच्या कोपऱ्यात उभारण्यात आला असून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. दररोज सुमारे ९ ते १० कलाकार येथे चित्रकला, व्यंगचित्र, शिल्पकला आणि इतर सर्जनशील कला सादर करतात. विशेषतः Fergusson College परिसरातील विद्यार्थी येथे येऊन आपली कला मांडतात.

फक्त कट्टा नव्हे, तर संधीचं व्यासपीठ

अनेक विद्यार्थ्यांकडे आर्थिक साधनांची कमतरता असली तरी त्यांच्या हातात कला आहे. या कट्ट्यामुळे त्यांना थेट नागरिकांशी संवाद साधण्याची आणि थोडाफार आर्थिक आधार मिळवण्याची संधी मिळते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने पर्यटक, नागरिक आणि विद्यार्थी यांच्यात कला पोहोचवण्याचे काम हा कट्टा करतो.

गेल्या ४० वर्षांपासून कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराने सांगितले की, १९९८ पासून ते या चौकात बसून चित्रकला सादर करत आहेत. त्या वेळी औपचारिक ‘कलाकार कट्टा’ नव्हता; पण सातत्याने बसून त्यांनी लोकांपर्यंत पोहोच साधली. नागरिकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच ही परंपरा टिकली, असे ते सांगतात.

वाहतूक कोंडीचे कारण खरेच कट्टा?

कट्टा हटवण्यामागे वाहतूक कोंडीचे कारण दिले जात असले तरी कलाकार याला विरोध करतात. त्यांच्या मते, खंडोजी बाबा चौक, गोखले चौक, डेक्कन जिमखाना कॉलनी आणि बीएमसीसी रस्ता परिसरात अनेक वर्षांपासून वाहतुकीची समस्या आहे. कट्टा सुरू होण्यापूर्वीही येथे कोंडी होत होती. त्यामुळे स्थलांतर केल्याने समस्या सुटेलच, याची खात्री नाही.

कलाकारांची मागणी स्पष्ट आहे. तक्रार करणाऱ्यांना प्रत्यक्षात किती अडचण होते, याची वस्तुनिष्ठ तपासणी करावी. वाहतुकीचा अभ्यास करून शाश्वत उपाययोजना कराव्यात; मात्र कला दडपण्याचा मार्ग स्वीकारू नये.

पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा प्रश्न

पुणे ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखले जाते. अशा शहरात तरुण कलाकारांसाठी निर्माण झालेले खुले व्यासपीठ हटवण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा परिणाम केवळ काही कलाकारांपुरता मर्यादित राहणार नाही. तो शहराच्या सांस्कृतिक ओळखीवरही प्रश्नचिन्ह उभे करू शकतो.

आता निर्णय महापालिकेच्या हातात आहे. वाहतूक सुरळीत ठेवत कलाकारांनाही न्याय देणारा तोडगा निघतो का, की ‘गुडलक चौक’चा कलाकार कट्टा इतिहासजमा होतो. हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11
Next Post
Kolhapur–Pune Express Update

Kolhapur–Pune Express Update : पुणे-कोल्हापूर अंतर फक्त ३ तासांत! महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात; जून २०२६ पासून प्रवाशांचा सुखद अन् सुसाट प्रवास!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.