पिंपरी: सायबर गुन्ह्यात आणखी (Pimpri Crime) एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. 65 वर्षीय महिलेला वरिष्ठ पोलीस अधिकारी व कुरिअर (Pune Crime) कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 1 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, फिर्यादी महिला व त्यांच्या पतीस पार्सलमध्ये ड्रग्ज व कागदपत्रे सापडल्याचे सांगून खोट्या प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवून पैसे उकळले गेले. आरोपींनी “पैसे व्हेरिफाय करुन परत मिळतील” असा विश्वास संपादन करून महिलेकडून विविध बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करवून घेतली.
या प्रकरणी अनेक मोबाईल नंबर, आयसीआयसीआय व बँक ऑफ बडोदा या बँकांचे खाते वापरले गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. फिर्यादीकडून जबरदस्तीने घेतलेली रक्कम 1,00,00,000 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गंभीर फसवणुकीचा तपास पोनि नाळे करीत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.







