Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवडमध्ये केकचे पैसे मागितले म्हणून बेकरी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 March 2026, 14:43

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला धाब्यावर बसवत ‘कोयता गँग’ने आता पिंपळे सौदागरसारख्या उच्चभ्रू वस्तीत शिरकाव केला आहे. केवळ खाल्लेल्या केकचे पैसे मागितले म्हणून एका टोळक्याने बेकरी चालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.

 

जगताप नगर, पिंपळे सौदागर येथील एका प्रसिद्ध बेकरीमध्ये गुरुवारी (26 फेब्रुवारी) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. आदित्य मानवतकर, अथर्व चव्हाण आणि यश दुर्गे ही संशयित आरोपींची नावे आहेत. बेकरी चालक नौशाद अहमद नेहमीप्रमाणे आपले काम करत असताना ही मुले तिथे आली. त्यांनी दुकानातील केक घेतला, पण पैसे न देताच ते बाहेर पडू लागले.

जेव्हा नौशाद यांनी प्रामाणिकपणे आपल्या मालाचे पैसे मागितले, तेव्हा तरुणांनी केवळ हुज्जतच घातली नाही, तर नौशाद यांच्या खिशात हात घालून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. आपली दहशत दाखवण्यासाठी त्यांनी सोबत आणलेला कोयता हवेत फिरवून “कोणी मध्ये आले तर याद राखा,” अशी धमकी देत परिसरात थरार निर्माण केला. भरवस्तीत रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक आणि दुकानदार काही काळ सुन्न झाले होते.

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. किरकोळ कारणावरून शस्त्रांचा वापर करणे ही एक गंभीर प्रवृत्ती बनत चालली आहे. पिंपळे सौदागर सारख्या आयटी हब आणि सुशिक्षित परिसरात अशा घटना घडणे, हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे करत आहे. जर व्यापाऱ्यांनी हक्काचे पैसे मागितले आणि त्यांना अशा प्रकारे लुटले गेले, तर व्यवसाय करायचा कसा, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31

आधी 10 व्यवहार अन् अचानक 24 तासांत आकडा वाढला! समता बँकेतील ‘त्या’ व्यवहारांनी वाढवलं अजितदादांच्या अपघाताचं गूढ; दमानियांचा थेट निशाणा

Monday, 6 April 2026, 16:21
Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48
Next Post
Pune

Pune : पुण्यातील 'या' ४ भागांत घर घेण्याकडे नागरीकांची पसंती! 'सेंट्रल पुणे' बनले गुंतवणुकीचा हॉटस्पॉट; बघा तुमचे क्षेत्र यादीत आहे का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.