Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Savarkar Gaurav Yatra : भोसरीत उसळला प्रखर हिंदूत्वाचा हुंकार! सावरकर गौरव यात्रेला सुमारे ३७ हजाराहून अधिक राष्ट्रप्रेमींची गर्दी…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 April 2023, 9:36

पिंपरी Savarkar Gaurav Yatra: ‘‘ भारत माता की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मी सावरकर, आम्ही सावरकर…’’ असा गगनभेदी घोषणा, ढोल-ताशा पथकाचा निनाद आणि सुमारे ३७ हजाराहून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या साक्षीने भोसरी विधानसभा मतदार संघात राज्यातील सर्वात मोठी ‘सावरकर गौरव यात्रा’ संपन्न झाली. (Savarkar Gaurav Yatra)

 

‘मी सावरकर’च्या जयघोषाने भोसरीसह परिसर दणाणला

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना महायुतीच्या पुढाकाराने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या पुढाकाराने बुधवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

भोसरी पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. तेथून दिघी रोड, हरी ओम स्वीट, आळंदी रोड, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे यात्रेची सांगता करण्यात आली.

यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, माजी सभापती एकनाथ पवार, गोरक्षक शिवशंकर स्वामी, स्थायीचे माजी सभापती विलास मडिगेरी, नितीन लांडगे, संतोष लोंढे, यांच्यासह भाजपा- शिवसेना महायुतीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यासह भाजपा परिवातील सर्व संस्था, संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या १५ दिवसांपासून सावरकर गौरव यात्रेची तयारी सुरू होती. मतदार संघातील महापालिका प्रभागनिहाय सावरकर प्रेमी नागरिकांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे यात्रेचा प्रचंड गर्दी झाली. पोलीस प्रशासनाच्या अचूक नियोजनामुळे यात्रा यशस्वी झाली. सावरकर प्रेमी नागरिक आणि हिंदूत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्सहात यात्रेत सहभाग घेतला.

भोसरी आणि परिसर भगवामय…

भारत माता की जय, जय श्रीराम, वंदे मातरम्‌, वीर सारकरांचा विजय असो, हिंदू हित की बात करेगा वहीं देश पे राज करेगा..! अशा घोषणा सहभागी सावरकर प्रेमी नागरिकांनी दिल्या. ढोल-ताशा पथकाचा खणखणाट, डोक्यावर सावरकर टोपी, हातात ‘आम्ही सावरकर’ असे फलक, भगव्या टोप्या त्यावर ‘मी सावरकर’ चा उल्लेख, महिलांची लक्षणीय उपस्थिती, वीर सावरकरांचा पोशाख केलेल्या व्यक्तीबरोबर सेल्फीचा आनंद, भगवा ध्वज दिमाखात फडकवताना कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यामुळे भोसरी आणि परिसर अक्षरश: भगवामय झाला होता. ‘‘सावरकरांनी अंदमानला शिक्षेसाठी घेवून जाताना समुद्रात घेतलेली उडी…’’ असा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. प्रभू श्रीराम आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराचा चित्ररथ, कमळाच्या प्रतिकृतीमध्ये ठेवलेला वीर सावरकरांचा पुतळा लक्ष वेधून घेत होता.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

BJP News | पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपातर्फे ‘सावरकर गौरव यात्रा’ – शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची माहिती…!

Pimpri Chinchwad : भाजपच्या वर्धापन दिनाची पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे जय्यत तयारी – संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची माहिती..!

Bullock Cart Race |चऱ्होलीतील बैलगाडा शर्यतीमधील वाद अखेर मिटला; आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थी…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

प्रेमासाठी ती पुण्यात आली! त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवर ठेवलं अन् वारंवार संबंध ठेवत…

Tuesday, 7 April 2026, 16:03
Next Post

Health News : ब्राऊन शुगर सेवन करण्याचे फायदे जाणून घ्या ..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.