Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘जीएसटी’ फसवणूक रॅकेटमधील ‘रेहमानी’वर कारवाईचा दणका! भाजपा आमदार महेश लांडगे यांची लक्षवेधी

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 15 July 2025, 16:44

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी-जाधववाडी येथील दीपक भगत यांना कर्ज देण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेतली. त्याच्या आधारे बनावट कंपनी स्थापन केली. त्या कंपनीच्या माध्यमातून बोगस बिले सादर केली आणि इनपूट टॅक्स घेवून सरकारचा करोडो रुपयांचा वस्तू व सेवा कर (GST) बुडवला आहे. सेवा कर गुप्तवार्ता संचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असली, तरी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन गृह विभाग व जीएसटी विभागाकडून आरोपींवर कठोर करावाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

 

जाधववाडी येथे राहणारा मोहम्मद कैश रहमानी याने कर्ज देण्याच्या बहाण्याने दीपक भगत यांची कागदपत्रे घेतली. त्याद्वारे बोगस कंपनी तयार केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. रेहमानी याने आशिया स्टील ट्रेडर्स दुकानाद्वारे कोट्यवधींचा जीएसटी बुडवला आहे. शहरात असे रॅकेट कार्यरत आहे. जे गोरगरिब लोकांची फसवणूक करीत आहे. राष्ट्रविघातक कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली.

आमदार लांडगे म्हणाले की, मोहम्मद रेहमानी यांने बनावट कंपनी स्थापन केली आणि करोडो रुपयांचा जीएसटी बुडवला. मूळ फिर्यादीवर दबाव आणला आणि जामीनावर हा व्यक्ती बाहेर आहे. अशाप्रकारची फसवणूक अनेक गोरगरीब लोकांची झाली आहे. देशविघात कृत्यांमध्ये हा पैसा वापरला जात असावा, असा संशय आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि संबंधितांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी. असे रॅकेट पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहे, या प्रकरणामध्ये सराईत लोकांचा सहभाग आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

काय आहे प्रकरण?

जाधवावडी येथे राहणारा मोहम्मद कैश रेहमानी याने लोन देण्याच्या बहाण्याने दीपक भगत यांची कागदपत्रे घेतली. त्याद्वारे आशिया स्टील ट्रेडर्स नावाची बनावट कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून कशफ ट्रेडिंग कंपनीला बनावट बिले दिली. यामाध्यमातून इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) घेवून 9.86 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवला. केंद्रीय गुप्तवार्ता महासंचालनालय कार्यालय पुणे यांनी चौकशी केली. जीएसटी त्यावरील व्याज आणि शास्ती असा 21.71 कोटी रुपयांच्या रकमेची वसुली करण्याचा आदेश केंद्रीय वस्तू व सेवा कर सहआयुक्त पुणे यांना देण्यात आला. फसवणूक प्रकरणी आरोपी मोहम्मद कैश रेहमानी आणि मोहमद अहमद उर्फ आदील रेहमानी या दोघांना अटक झाली होती. आरोपी जामिनावर बाहेर आहेत. अटक न झालेला आरोपी अब्दूल मुस्लीम चौधरी याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे अर्ज केला असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

गोरगरीब कामगारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन बनावट कंपनी स्थापन करणे आणि त्याआधारे शासनाची जीएसटी बुडवून मोठ्या प्रमाणात फसवणूक करणे, ही गंभीर बाब आहे. सदर प्रकरण केवळ सरकारची फसवणूक यापुरते मर्यादीत नाही. तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असून, देशविघातक कृत्यांमध्ये हा पैसा वापरला जात असल्याची शक्यता आहे. गृहविभाग, गुप्तचर यंत्रणा यांच्या माध्यमातून सखोल चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत ‘ब्रीफिंग’ करुन सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल.

-ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

Pune News: शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; “आंबील ओढा सीमाभिंतीचा निधी कुठे गेला?”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.