Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्त थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीला तिरंगा झेंड्यातील ३ रंगाच्या फळांची व फुलांची आकर्षक सजावट…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 15 August 2022, 17:12

लोणी काळभोर : अष्टविनायकापैकी  प्रसिद्ध असलेले  श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली ) येथे  संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविक  सोमवारी (ता.१५ ) दाखल झाले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते.

आज या शतकातील दुग्धशर्करा योग आहे. संकष्ट चतुर्थी व भारत देशाचा ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आहे. या सुवर्ण योगाचे औचित्य साधून, श्री चिंतामणी गणपती तिरंगा झेंड्यातील ३ रंगाच्या फळांची व फुलांची आरास युवा नेते युवराज काकडे यांच्या वतीने करण्यात आली होती.

मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, काजूगर, कोकम, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक विक्रेते बसले होते. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले यांच्या दुकानावर मोठी गर्दी झाली. त्यामुळे मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती.

मागील तीन दिवस सुट्टी आल्याने भाविक मोठ्या संख्येने चिंतामणीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आगलावे यांच्या हस्ते ‘श्रीं’ ची पूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास, पायघड्या सावलीसाठी मंडप व्यवस्था तसेच भाविकांसाठी स्वच्छता ग्रहाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी भाविकांना देवस्थानच्या वतीने उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले.

 

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच थेऊर ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. आनंद महाराज तांबे हे मंदिर परिसरात लक्ष देऊन होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13
Next Post

'या' आठवड्यात मनोरंजनाचा डबल धमाका ; OTT वर चित्रपटांसह वेब सीरिजसुद्धा प्रदर्शित होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp