चाकण, (पुणे) : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुल (ता. खेड) गावात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींना चाकण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डी.बी) पथकाने अटक केली आहे. यात एका सोनाराचाही समावेश असून याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक केली असून यात एका अल्पवयीनचाही समावेश आहे.
परश्या गौतम काळे, भिमा आदेश काळे (रा. दोघेही देऊळगांव गलांडे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) सचिन चंदर भोसले, धंग्या चंदर भोसले, रा. दोघेही खरातवाडी, ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर, राजेश अशोक काळे (रा. रांजनगाव मज्जीद ता. पारनेर जि. अहिल्यानगर) अक्षय ऊर्फ किशोर हस्तलाल काळे, रा. पिंपळगांव पिस्सा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) विधीसंघर्षीत बालक तसेच चोरीचा मुददेमाल घेणारा सोनार अभय विजय पंडीत, वय-38, रा. सुतार गल्ली, कोळगांव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर आणि आरोपींना लपवुन ठेवणारा आरोपीतांच्या बहीनीचा पती गणेश शिवाजी काळे( रा. तांदळी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुख्य आरोपी सचिन चंदर भोसले याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून इतर आरोपींना अटक करण्यासाठी चाकण पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, नगर तालुका, बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा येथे 15 दिवस ट्रॅप लावून वरील आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 12 लाख रुपये किमतीचे 13 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, तीन दुचाकी, हत्यारे, असा एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6 दरोडे घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारीला पहाटे बहुळ गावातील फुलसुंदर वस्ती येथे जयराम लक्ष्मण वाडेकर यांच्या घराचा दरवाजा तोडून पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून जयराम यांचा मुलगा अशोक आणि त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्या पोटात चाकू, तलवारीने वार केले होते. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरोड्याच्या घटनेतील आरोपी पुन्हा दरोडा टाकण्यासाठी चिंचोशी गावात आले असल्याची माहिती उपायुक्त शिवाजी पवार, सहायक निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक करताना एका दरोडेखोराने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड हे जखमी झाले होते. यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी प्रत्युत्तरादाखल दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी सराईत गुन्हेगार सचिन भोसले याच्या पायाला लागली होती. त्याला घटनास्थळीच पकडण्यात आले होते. इतर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले.
दरम्यान, तपास पथकाने सलग 15 दिवस श्रीगोंदा, पारनेर, नगर तालुका, बीड जिल्हयातील आष्टी व पाटोदा या ठिकाणी गुन्ह्याचा तपास केला. गुन्हयातील अटक आरोपी यांनी चाकण पोलीस स्टेशन हददीत यापुर्वी दरोडा तसेच घरफोडी सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. सोनार आरोपी अभय पंडीत यास आरोपीनी चोरुन आणलेले सोन्याचे दागीने हे गुन्हयातील मुददेमाल आहे असे माहित असुनही तसेच आरोपी हे रेकॉर्ड वरील कुविख्यात दरोडेखोर आहेत हे माहिती असुनही सोनाराने विकत घेतलेले एकुण 12 लाख रुपये किंमतीचे 130 ग्रॅम सोन्याचे दागीने, व आरोपींकडुन रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या तीन मोटार सायकल व घरफोडीची हत्यारे, मारहाण करण्यासाठी वापरलेली पालघन, तलवार, चाकु तसेच लोखंडी कटावणी, खुटटा असा एकुण सुमारे 15 लाख रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोनि गुन्हे नाथा घार्गे, तपास पथकाचे प्रमुख सपोनि प्रसन्न ज-हाड, सहायक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सुकाळे पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, दत्ता टोके, राजु जाधव, अनिकेत पाटोळे, भैरोबा यादव, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, रुषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, नवनाथ खेडकर, सुनिल भागवत, उध्दव गर्जे, महेश कोळी, महादेव बिक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, किरण घोडके, विकास तारु, कैलास गर्जे, प्रतिक चव्हाण यांनी केलेली आहे