पुणे: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रसिद्ध (Nirmala Navale) नेत्या आणि पुणे (Karegaon News) जिल्ह्यातल्या कारेगाव गावाच्या (Ajit Pawar) सरपंच ‘निर्मला नवले’ यांचं (Pune News) सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोइंग आहे. सरपंच मॅडम सोशल मीडियावर नेहमीच पोस्टद्वारे किंवा वेगवेगळ्या माध्यमाद्वारे सक्रिय असतात. त्यांच्या इंस्टाग्राम रीलला सुद्धा मिलियन्स मध्ये व्ह्यूज जातात. त्यांच्या आयुष्यातले सुखदुःखाचे क्षण आणि प्रसंग त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी शेअर करत असतात आणि नेहमी वेगवेगळी माहिती सोशल मीडियाद्वारे त्या देत असतात.

राज्यसह पुणे जिल्ह्यात सुद्धा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता जोमाने सुरू झालेली आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्ष नेतृत्वाकडे जोरदार ‘सेटिंग’ लावलेली आहे. याच पार्श्वभूमीवर कारेगावच्या सरपंच मॅडम यांनी सुद्धा एक मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्मला नवले यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच एक मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्या कारेगावच्या राजकारणासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध अधिवेशन, बैठका, मेळावे यांसह वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय असल्याचंसुद्धा अनेकवेळा दिसून आलं आहे.
पुणे जिल्ह्यातल्या कारेगावसारख्या मोठ्या गावाच्या सरपंचपदाचा बहुमान पटकावल्यानंतर आता निर्मला नवले तालुक्याच्या राजकारणामध्ये एन्ट्री करण्याच्या जोरदार तयारीला लागल्या आहेत. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर नवले यांची पुढची राजकीय वाटचाल सुद्धा आता निश्चित झालेली आहे. सरपंच निर्मला नवले यांनी इंस्टाग्रामवरची यासंदर्भातली पोस्ट सध्या फार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियाच्या या पोस्टमध्ये सरपंच निर्मला नवले यांनी सांगितले की “मी आगामी पंचायत समिती निवडणूक लढवायला इच्छुक असून, पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करावा” राजकारण आणि समाजकारणाचा नवा अध्याय रचायला आपण इच्छुक असल्याचे सुद्धा निर्मला नवले यांनी पोस्ट मधून स्पष्ट केले. “कारेगावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे आणि पार्टीच्या वतीने पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे” अशी घोषणा निर्मला नवले यांनी केली आहे.
निर्मला नवले यांनी यावेळी माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला. त्यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये “आपला विश्वास माझा निर्धार, आता फक्त विकास” असं सुद्धा म्हटलं आहे. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांनी पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचं दिसून येतंय मात्र अजित पवार सरपंच निर्मला नवले यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देणार की वेटिंग वरच ठेवणार? हे लवकर स्पष्ट होईल.
पुणे जिल्ह्यातल्या कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांची सध्या सोशल मीडिया पोस्ट ही प्रचंड व्हायरल होत आहे. निर्मला नवले या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहेत आणि सोशल मीडियावर सरपंच मॅडमचा मोठा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्रामवर त्यांचे तब्बल 539K फॉलोवर्स आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सुद्धा त्यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच नवले यांना त्यांच्या पतीने ‘रेंज रोवर’ ही आलिशान महागडी गाडी गिफ्ट केली होती आणि ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली होती.







