Nanded Crime: नांदेड: महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून एका तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केले. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.

हेही वाचा- मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाचा ‘ग्रीन सिग्नल’; झेडपी आणि महापालिका निवडणुकांचा अडथळा अखेर दूर!
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहराच्या इतवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तरुणावर गोळी झाडून त्याची हत्या केली एवढेच नाही तर आरोपींनी मृतदेहाचे तोंड अक्षरश: दगडाने ठेचून काढला आहे. या अतिभंयकर घटनेनं इतवार भागात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृताचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. पुढील चौकशीत आरोपींची माहिती शेजाऱ्यांकडून घेण्यात आली. तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध घेण्यात आला आणि अखेर काही तासांतच आरोपींना अटक करण्यात आले.
आरोपींनी युवकाची हत्या का केली यासंदर्भात चौकशी सुरु आहे. मृतक आणि आरोपी हे तिघे ही ओळखीचे होते अशी प्राथमिक माहिती तपासातून बाहेर आली आहे. सक्षम तोटे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींची ओळख अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या थरारक घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.






